-
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून अभिनेत्री विशाखा सुभेदारला ओळखले जाते.
-
अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये विशाखा सुभेदारने आपला ठसा उमटवला आहे. एक उत्तम कॉमेडियन म्हणून तिला ओळखले जाते.
-
विनोदी भूमिकांसाठी ओळखली जाणाऱ्या विशाखा सुभेदार यांनी ‘फु बाई फू’ आणि ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कॉमेडी शोमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
विशाखा नुकतंच झी मराठीवरील लोकप्रिय असलेल्या बस बाई बस या कार्यक्रमात सहभागी झाली होती.
-
या कार्यक्रमात तिने तिचा सुरुवातीचा काळ, नाटक, निर्माती म्हणून सुरु असलेल्या प्रवासाबद्दल भाष्य केले.
-
तसेच यावेळी तिने एका कार्यक्रमादरम्यान माझ्या वजनावरुन माझी खिल्ली उडवण्यात आली होती, याबद्दल खुलासाही केला.
-
या दरम्यान सूत्रसंचालक सुबोध भावेने विशाखा सुभेदारसह रॅपिड फायर राऊंड खेळला.
-
यावेळी तिला यातील कोण आवडतं याबद्दल विविध प्रश्न विचारण्यात आले.
-
आवडतं नाटकं एक डाव भटाचा की कुर्रर्रर्र असा प्रश्न तिला विचारण्यात आला.
-
त्यावर तिने एक डाव भटाचा असे सांगितले.
-
यानंतर तिला अभिनेत्री नम्रता आवटे की निर्मिती सावंत यातील कोण आवडतं? असे विचारले.
-
त्यावर तिने निर्मिती ताई असे उत्तर दिले.
-
समीर चौगुले की पॅडी कांबळे यातील आवडता सहकलाकार कोणता? असा प्रश्न विशाखाला विचारण्यात आला.
-
त्यावर तिने पॅडी कांबळे असे उत्तर दिले.

Maharashtra Budget 2025 LIVE Updates: आज लाडक्या बहिणींसाठी २१०० रुपयांची घोषणा होणार? अजित पवारांच्या अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात