-
मणीरत्नम दिग्दर्शित बहुचर्चित पीएस १ म्हणजेच ‘पोन्नियिन सेलवन १’ हा चित्रपट ३० तारखेला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दिग्गज दाक्षिणात्य कलाकारांबरोबर बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
-
आयमॅक्समध्ये प्रदर्शित होणारा ‘पोन्नियन सेल्वन’ हा पहिला तामीळ चित्रपट आहे. ५ वेगवेगळ्या भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
-
मणीरत्नम यांचं हा ड्रीम प्रोजेक्ट असून यामध्ये त्यांनी त्यांचं सर्वस्व पणाला लावलं आहे.
-
या चित्रपटात विक्रम चियान, जयम रवि, कार्थी, ऐश्वर्या राय बच्चन आणि त्रिशा कृष्णन हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
-
चित्रपटासाठी विक्रमने १२ कोटी, तर ऐश्वर्याने १० कोटी एवढं मानधन घेतल्याची चर्चा आहे.
-
हा चित्रपट भारताच्या प्राचीन इतिहासावर बेतलेला आहे. ट्रेलरमध्ये दिसणारे सेट्स हे भव्य आणि डोळे दिपवणारे आहेत. या चित्रपटाचं बजेट तब्बल ५०० कोटी इतकं आहे.
-
या चित्रपटात चोळ साम्राज्य आणि चोळ राजाची कहाणी उलगडणार आहे.
-
अभिनेता विक्रमने याचा खुलासा केला आहे की ही ९ व्या शतकातील गोष्ट आहे. शिवाय कोलंबसने अमेरिकेचा शोध लावण्याआधीची ही कथा आपल्यासमोर या चित्रपटातून उलगडणार आहे.
-
चित्रपटाचं संगीत ए आर रहमान यांनी दिलं आहे.
-
मध्यंतरी एका ठिकाणी प्रमोशनसाठी जाताना चित्रपटाच्या टीमने बिझनेस क्लासमधून नव्हे तर इकॉनॉमी क्लासमधून प्रवास केला. ए आर रहमानने त्यावेळचा एक फोटो सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला होता.
-
ऐश्वर्या राय बच्चन आणि त्रिशा कृष्णन या दोघी अभिनेत्री प्रथमच एकत्र काम करत असून, दोघींच्याही भूमिका अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
-
‘पोन्नियन सेल्वन१’ ३० सप्टेंबर २०२२ रोजी हिंदी, तामीळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड या ५ भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून, पहिले काही दिवस चित्रपटाचं तिकीट दर हा केवळ १०० रुपये असू शकतो असं म्हंटलं जात आहे. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल