-
हृतिक रोशन, सैफ अली खान यांचा ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.
-
ट्रेलर बघितल्यापासून चाहते चित्रपट बघण्यासाठी उत्सुक आहेत.
-
इतकेच नव्हे तर या चित्रपटाच्या अ ॅडव्हान्स बुकिंगलाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
-
बॉलिवूडमधील आगामी बिग बजेट चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाचे नाव घेतले जाते.
-
या चित्रपटातील कलाकारांच्या मानधनावर जास्त पैसे खर्च झाले आहेत.
-
लक्षवेधी गोष्ट अशी की, सैफ अली खानच्या मानधनापेक्षा चौतट रक्कम हृतिक रोशनने आकारली आहे.
-
या चित्रपटात हृतिक रोशनच्या भावाची भूमिका साकारणाऱ्या रोहित सराफ याने १ कोटी मानधन आकारले आहे.
-
या चित्रपटात राधिका आपटे महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. यासाठी तिने ३ कोटी रुपये घेतले आहेत.
-
शारीब हाश्मी याने ५० लाख मानधन आकरल्याचे बोलले जात आहे.
-
योगिता बिहानी हिने या चित्रपटात काम करण्यासाठी ६० लाख रुपये आकारले आहेत.
-
सैफ अली खान या चित्रपटात हृतिक रोशनला टक्कर देताना दिसेल. या चित्रपटासाठी त्याने १२ कोटी मानधन घेतले आहे.
-
हृतिक रोशनने या चित्रपटातील कलाकारांपेक्षा सर्वात जास्त मानधन आकारले आहे. या चित्रपटासाठी त्याने तब्बल ५० कोटी रुपये घेतले आहेत, ही रक्कम सैफला मिळालेल्या रकमेपेक्षा चौपट आहे.
अमरावती ते मुंबई विमान प्रवासाचे वेळापत्रक, तिकीट दर जाहीर; फक्त…