-
मणिरत्नम यांचा बिग बजेट चित्रपट पोन्नियिन सेल्वन येत्या ३० सप्टेंबरला प्रदर्शित होतोय. त्याआधी सोशल मीडियावर चित्रपटाच्या बजेटसह कलाकारांच्या मानधनाची जोरदार चर्चा रंगली आहे.
-
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ‘पोन्नियिन सेल्वन’मधील मोठ्या ब्रेकनंतर पुनरागमन करत आहे.
-
मिळालेल्या माहितीनुसार ऐश्वर्या राय बच्चनने या चित्रपटासाठी तब्बल १० कोटी रुपये मानधन घेतलं आहे.
-
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीची प्रसिद्ध अभिनेत्री शोभिता धूलिपाला या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारतेय.
-
शोभिताने या चित्रपटासाठी १ कोटी रुपये एवढं मानधन घेतल्याचं बोललं जातंय.
-
अभिनेत्री ऐश्वर्या लक्ष्मी ‘पोन्नियिन सेल्वन’मध्ये पुंगुझली ही भूमिका साकारत आहे.
-
मिळालेल्या माहितीनुसार तिने या भूमिकेसाठी १.५ कोटी रुपये एवढं मानधन घेतलं आहे.
-
उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जाणार दाक्षिणात्य अभिनेता जयम रवी या चित्रपटात अरुलमोझी वर्मनच्या भूमिकेत आहे.
-
‘पोन्नियिन सेल्वन’साठी जयम रवीने तब्बल ८ कोटी रुपये एवढं मानधन घेतल्याचं बोललं जात आहे.
-
अभिनेत्री त्रिशा कृष्णन या चित्रपटात राजकुमारी कुंदवईच्या भूमिकेत दिसणार आहे.
-
या भूमिकेसाठी त्रिशाने जवळपास २.५ कोटी रुपये मानधन घेतल्याचं बोललं जात आहे.
-
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता चियान विक्रम या चित्रपटात करिकालनची भूमिका साकारताना दिसणार आहे.
-
या भूमिकेसाठी त्याने तब्बल १२ कोटी रुपये एवढी मोठी रक्कम मानधन म्हणून घेतल्याची चर्चा आहे.
-
‘पोन्नियिन सेल्वन’मध्ये अभिनेता कार्थी ‘वल्वर रेयान विंदियादेवन’ ही खास भूमिका साकारताना दिसणार आहे.
-
या भूमिकेसाठी त्याला ५ कोटी रुपये एवढं मानधन मिळाल्याचं बोललं जात आहे. (फोटो साभार- सोशल मीडिया)

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा