-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम म्हटलं की कॉमेडी क्वीन नम्रता संभेरावचा चेहरा डोळ्यासमोर उभा राहतो.
-
नम्रता एकापेक्षा एक सुंदर पात्र या कार्यक्रमाध्ये साकारताना दिसते.
-
अभिनेत्री म्हणून कलाक्षेत्रामध्ये तिने स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे.
-
तिच्या विनोदी शैलीचे लाखो चाहते आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या नव्या पर्वातही ती तितकीच धमाल करते.
-
नम्रता सोशल मीडियावरही फार सक्रिय असते.
-
तिचे विविध व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असतात.
-
आताही तिने नवरात्रीनिमित्त खास फोटोशूट केलं आहे. यामध्ये तिचा तुम्ही कधीही न पाहिलेला लूक पाहू शकता.
-
एका कपड्यांच्या ब्रँडसाठी तिने हे खास फोटोशूट केलं आहे.
-
लाल रंगाची साडी, हिरव्या रंगाचा ब्लाऊज, नाकात नथ असा नम्रताचा लूक अगदी थक्क करणारा आहे.
-
नम्रताने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचा मराठमोळा लूक पाहून चाहतेही फिदा झाले आहेत.
-
सुंदर दिसत आहेस, एकमद भारी अशा अनेक कमेंट नम्रताच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तसेच तिच्या लूकचंही कौतुक केलं आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”