-
बिग बॉस मराठी हा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या २ ऑक्टोबरपासून बिग बॉस मराठीचे चौथे पर्व सुरु होणार आहे.
-
बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाची घोषणा झाल्यापासून सोशल मीडियावर केवळ या शोचीच चर्चा आहे.
-
यंदा या कार्यक्रमाची थीम ALL IS WELL अशी असणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर करत आहेत.
-
नुकतंच या कार्यक्रमाच्या निमित्ताने एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांना बिग बॉससह अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.
-
यावेळी महेश मांजरेकरांना तुमच्यासाठी तुमच्या आयुष्यातील ऑल इज वेल क्षण कोणता होता? असा प्रश्न विचारण्यात आला.
-
“तब्बल १५ तास ऑपरेशन सुरु होतं. १५ तास मला काहीही शुद्ध नव्हती. पण ऑपरेशनला जाण्यापूर्वी माझ्यात फार आत्मविश्वास होता. त्यामुळे मी जेव्हा डोळे उघडले, तेव्हाचा तो क्षण माझ्यासाठी ऑल इज वेल होता,” असे त्यांनी सांगितले.
-
“मी लूकवर काहीही काम करत नाही. गेल्या पर्वात माझ्याकडे पर्याय नव्हता. तेव्हा मी नुकताच केमो घेऊन आलो होतो”, असे ते म्हणाले.
-
“माझे केमोमुळे केस गेले होते. त्यानंतर जे केस आले ते कुरळे आले”, असे त्यांनी सांगितले.
-
“अनेक लोक मला कुरळ्या केसांबद्दल विचारतात. त्यासाठी केमो करावी लागेल, असं मी सांगतो…”, असं महेश मांजरेकर हसत हसत म्हणाले.
-
यानंतर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केलेल्या विकास पाटीलने महेश सर त्यांचा लूक स्वत:च डिझाईन करतात, असा खुलासा केला.
-
दरम्यान आता या बिग बॉस मराठीमध्ये कोण कोणते कलाकार असणार, पुन्हा तोच राडा होणार का? मैत्री आणि प्रेमाचे वारे वाहणार का? याची चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे.

IND vs PAK: “माझी विकेटनंतर सेलिब्रेट करण्याची…”, गिलला बोल्ड केल्यानंतर भुवई उंचावणाऱ्या पाकिस्तानच्या अबरारचं मोठं वक्तव्य; सामन्यानंतर काय म्हणाला?