-
शाहरुख खान व त्याची पत्नी गौरी खान यांची केमिस्ट्री नेहमीच सर्वांना भुरळ घालते. याच किंग खान बद्दल गौरीने कॉफी विद करण शोमध्ये काही भन्नाट खुलासे केले आहेत. शाहरुखच्या विचित्र सवयी सांगताना गौरी म्हणते की शाहरुख सर्वात जास्त वेळ हा बाथरूममध्येच घालवतो.
-
पण अशा सवयी असणारा शाहरुख एकटाच नाही बरं का.. बॉलिवूडच्या सेलिब्रिटींच्या कदाचितच तुम्ही ऐकल्या असतील अशाच विचित्र सवयी पाहुयात..
-
सुरुवातच शाहरुखपासून करूयात.. किंग खान तसा तर खवय्या आहे पण त्याला आईस्क्रीमची विशेष चिड येते. त्याला अगदी कोणत्याच कारणाने आईस्क्रीम खायला आवडत नाही.
-
सलमान खानची विचित्र आवड म्हणजे साबण गोळा करणे पण तुम्हाला हे माहित आहेत का सलमान रुमाल अगदी खास वापरतो. मखमली रुमाल सोडून सलमान आपल्या चेहऱ्याला अन्य रुमालाचा स्पर्शही होऊ देत नाही.
-
भारतीय नारी या दोन शब्दांना जगणारी विद्या बालनला साड्यांचे वेड आहे. तिच्याकडे तब्बल ८०० साड्या आहेत. विद्या सांगते की ती स्वतःला स्वप्नात सुद्धा साडीच नेसलेली बघते.
-
सुष्मिता सेनला बंद बाथरूममध्ये अंघोळ करायला आवडत नाही त्यामुळे तिने आपल्या घराच्या छतावर स्विमिंग पूल बनवून घेतला आहे.
-
शेहनशाह अमिताभ बच्चन यांना हातात दोन घड्याळ घालण्याची सवय आहे. एका घड्याळात भारतीय वेळ तर दुसऱ्या घड्याळात आपल्या कुटुंबातील सदस्य ज्या देशात आहेत तिथली वेळ बिग बी सेट करून घेतात. ते नेहमीच अशी दोन घड्याळे घालून दिसत नाहीत पण त्यांना ही सवय आहे.
-
शाहिद कपूर हा प्रचंड कॉफी प्रेमी आहे
-
प्रीती झिंटा हॉटेलमध्ये राहण्याआधी त्यांच्या खोल्यांमधील वॉशरूमची स्वतः तपासणी करते. या आधीही अस्वच्छ वॉशरूम असल्यास अस्वस्थ होत असल्याचेही प्रीतीने सांगितले आहे.
महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन