-
‘बिग बॉस’ मराठीच्या नव्या पर्वाची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
-
या कार्यक्रमाच्या आधीच्या तिन्ही पर्वांना प्रेक्षकांनी तूफान प्रतिसाद दिला.
-
त्यानंतर या कार्यक्रमाचे चौथे पर्व प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाले आहे.
-
दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकरच या शोचे सुत्रसंचालक असतील.
-
‘बिग बॉस’च्या घरात कोणकोणते स्पर्धक सहभागी होणार याबाबत अनेक चर्चा रंगत आहेत.
-
दरम्यान राजकारणातील कोणती व्यक्ती बिग बॉसच्या घरात त्यांना पाहायला आवडेल याबद्दल महेश मांजरेकरांनी एक मोठा खुलासा केला आहे.
-
बिग बॉसच्या घरात त्यांना संजय राऊत यांना स्पर्धक म्हणून पहायला आवडेल असं महेश मांजरेकर म्हणाले.
-
बिग बॉसच्या घरात येण्यासाठी तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळेपण असावं लागतं आणि ते संजय राऊत यांच्यात आहे, असे ते म्हणाले.
-
त्याचबरोबर महेश मांजरेकर यांना निटेश राणे यांनाही बिग बॉसच्या घरात पहायला आवडेल असे ते म्हणाले.
-
त्याशिवाय अमोल मिटकरी यांचेही नाव महेश मांजरेकर यांनी घेतलं.
-
अमोल मिटकरी यांचे बोलणे अत्यंत स्पष्ट आणि तडफदार असतं त्यामुळे महेश मांजरेकरांना अमोल मिटकरी यांना बिग बॉसच्या घरात पहायला आवडेल असा खुलासा त्यांनी केला.
-
‘ऑल इज वेल’ ही या नव्या पर्वाची थीम आहे. त्यामुळे बिग बॉसच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

मुलाच्या परीक्षा केंद्राबाहेर प्रियकराबरोबर उभी होती पत्नी; बाईकवरून पती आला अन्… होत्याचं नव्हतं झालं!