-
सोनी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम लोकप्रिय आहे. छोट्या पडद्यावरील या कार्यक्रमाचे लाखो चाहते आहेत.
-
कल्याणच्या शिवाली परबलाही याच कार्यक्रमातून प्रसिद्धी मिळाली. विनोदाचं अचूक टायमिंग साधत शिवाली प्रेक्षकांना खळखळून हसवते.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून शिवाली घराघरात पोहोचली.
-
शिवालीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
-
नुकतंच शिवालीने फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.
-
फोटोमध्ये निळ्या रंगाचा शिमरी ड्रेस शिवालीने परिधान केला आहे.
-
साजेसा मेकअप आणि मोठ्या कानातल्यांनी शिवालीने ग्लॅमरस लूक केला आहे.
-
फोटोसाठी तिने हटके पोझही दिल्या आहेत.
-
शिवालीचं हे ग्लॅमरस फोटोशूट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
एका चाहत्याने “शिवाली हे खरं आहे का?”, अशी मजेशीर कमेटं केलं आहे. तर दुसऱ्याने ‘स्वप्न सुंदरी’ अशी कमेंट केली आहे.
-
परंतु शिवालीच्या फोटोवरील एका चाहत्याने केलेली कमेंट लक्षवेधी ठरत आहे. “बॉलिवूडमध्ये एन्ट्री दिसतेय”, अशी कमेटं चाहत्याने केली आहे.
-
शिवालीने मराठी चित्रपटातही काम केलं आहे. ‘व्हॉट्स अप लव्ह’, ‘प्रेम प्रथा दुश्मन’ या चित्रपटात ती दिसली होती.
-
अनेकदा शिवाली तिचे फोटो सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करत असते.
-
(सर्व फोटो : शिवाली परब/ इन्स्टाग्राम)
होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती