-
सध्या मनोरंजन क्षेत्रात एकाच शोची सर्वाधिक चर्चा आहे तो म्हणजे बिग बॉस. छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त शो म्हणून याकडे पाहिलं जातं.
-
येत्या २ ऑक्टोबरपासून ‘बिग बॉस’ मराठीचे चौथे पर्व सुरु होणार आहे.
-
त्यातच ‘बिग बॉस मराठी’मध्ये सहभागी होणारे स्पर्धक कोण असणार याबद्दल उत्सुकता पाहायला मिळत आहे.
-
विविध क्षेत्रातील १६ कलाकार घेऊन बिग बॉस मराठीचे चौथे पर्व सज्ज झाले आहे. मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करायला हा कार्यक्रम सज्ज झाला आहे.
-
या कार्यक्रमादरम्यान महेश मांजरेकरांना तुम्हाला बिग बॉसच्या घरात पहिल्या तीन सीझनमधील कोणत्या स्पर्धकांना पुन्हा पाहायला आवडेल आणि कोणाला नाही असा प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, “मला अभिजीत बिचुकलेंना पुन्हा बिग बॉसमध्ये पाहायला आवडणार नाही.”
-
“अभिजीत बिचुकले गेममध्ये भाग घेत नव्हता. त्याच्यात तो युएसपी आहे पण तो किती वेळ पाहणार. घरात ऑलराऊंडर प्लेअर पाहिजेच. तिथे असलेल्या प्रत्येकाचा एक युएसपी आहे”, असे महेश मांजरेकर म्हणाले.
-
त्यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना अभिजीत बिचुकलेने प्रतिक्रिया दिली. यावेळी त्याने थेट बिग बॉस मराठीचे सूत्रसंचालक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांना चॅलेंज दिलं आहे.
-
“महेश मांजरेकरांना एक विचारावं लागेल गेम म्हणजे नक्की कोणता गेम. त्यांना नक्की कोणता गेम म्हणाचे आहे. मला महेश मांजरेकर जो गेम सांगतील तसा गेम मी खेळू शकतो”, असे अभिजीत बिचुकले म्हणाला.
-
“पण मला एक सांगायचं जसं आमच्यासारखे कलाकार, हरहुन्ररी माणसं जशी शोधून तिथे नेतात, ते एंडोमल कंपनीचं काम आहे. मला त्यांनी हिंदीत लाँच केलंय.”
-
“महेश मांजरेकर पैसे देऊन तिथे नोकरी करतात. त्यामुळे त्यांच्या विधानाला किती आणि कशासाठी महत्त्व द्यायचं?” असेही बिचुकले म्हणाला.
-
“आता एंडोमल कंपनीने मला इतकं मोठं केलंय, जर उद्या ते म्हणाले बिचुकले साहेब आम्हाला तुम्ही पुन्हा शो मध्ये पाहिजे कारण सेकेंड सीझन माझा कोणामुळे गाजला? मी किती टीआरपी दिला?” असा सवालही अभिजीत बिचुकलेने केला.
-
“माझ्यामुळे बिग बॉस हा शो घराघरात गेला. त्यांना याची जाण असेल तर महेश मांजरेकरांच्या कोणत्याही वक्तव्याला ती कोणतीही किंमत देणार नाही.”
-
“कदाचित भविष्यात मी बिग बॉस मराठीचाचा अँकर असेल.”
-
“उद्या मला त्यांनी हिंदी बिग बॉसमध्ये परत बोलवलं तिथे अँकर सलमान असला तरी मी त्या कंपनीचा मान ठेवून जाईन. कंपनीपुढे सलमान काहीही बोलणार नाही.”
-
“त्यामुळे मी कलर्स किंवा एंडोमल कंपनीबद्दल काहीही वाईट बोललो नाही. माझं त्यांच्यावर फार प्रेम आहे”, असे अभिजीत बिचुकलेने म्हटले.
-
दरम्यान येत्या २ ऑक्टोबरपासून ‘बिग बॉस’ मराठीचे चौथे पर्व सुरु होणार आहे.

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती