-
पहिले तीन सीझन हिट ठरल्यानंतर बहुप्रतिक्षीत ‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यंदाच्या पर्वात कोणते स्पर्धक सहभागी होणार, याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे.
-
‘ऑल इज वेल’ ही यंदाच्या पर्वाची थीम आहे. ‘बिग बॉस मराठी’चं घर कसं असेल याची सगळ्यांनाच उत्सुकता होती.
-
आम्ही तुम्हाला फोटोच्या माध्यमातून ‘बिग बॉस मराठी’च्या घराची सफर घडवणार आहोत.
-
‘बिग बॉस मराठी’च्या घरासाठी यंदा खास चाळ संस्कृतीवर आधारित थीम करण्यात आली आहे.
-
‘बिग बॉस’च्या घरातील लिव्हिंग एरिया. इथेच महेश मांजरेकर वीकेंडला स्पर्धकांची शाळा घेतात.
-
लिव्हिंग एरियात मुखवट्यांनी डिझाइन करण्यात आलेली ही भिंत.
-
लिव्हिंग एरियातील मोगऱ्याची फुलांनी सजवलेलं हे झुंबर लक्ष वेधून घेत आहे.
-
‘बिग बॉस’च्या घरातील किचन.
-
जेवण बनवण्याबरोबरच स्पर्धक इथे गॉसिपही करताना दिसतात.
-
घरातील सदस्यांसाठी ‘बिग बॉस’च्या घरात खास तयार करण्यात आलेली बेडरूम.
-
महिला आणि पुरुषांसाठी बेडरुममध्ये वेगवेगळी व्यवस्था करण्यात आली आहे.
-
बेडरूममधील भिंतीवर पक्ष्यांची चित्रे काढण्यात आली आहेत.
-
बेडरूममध्येच कॅप्टनसाठी आलिशान खोली तयार करण्यात आली आहे.
-
‘बिग बॉस’च्या घरातील स्टोअर रूम.
-
‘बिग बॉस’च्या घरातील वॉशरुममध्ये यंदा जंगल थीम करण्यात आली आहे.
-
संपूर्ण वॉशरुममध्ये हिरवळ पाहायला मिळत असून भिंतीवर प्राण्यांची चित्रे लावण्यात आली आहेत.
-
बाथरूममध्ये अनेकदा स्पर्धक गॉसिप करताना दिसतात.
-
‘बिग बॉस’च्या घरातील जेल.
-
घरातील सदस्यांसाठी तयार करण्यात आलेलं जीम.
-
स्विमिंगपूल एरियामध्ये फेटा लातलेले मुखवटे लावण्यात आलेले आहेत.
-
‘बिग बॉस’च्या घरात यंदा ‘चाय पे चर्चा’ करण्यासाठी खास कट्टा तयार करण्यात आला आहे.
-
यंदाच्या पर्वातील ‘बिग बॉस’च्या घरातील खास आकर्षण असलेली ही जागा म्हणजे चाळीतील बाल्कनी.
-
(सर्व फोटो : प्रदीप पवार,प्रतिनिधी )
होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती