-
सध्या सोशल मीडियावर लोकप्रिय शो बिग बॉस १६ ची चर्चा आहे. यंदा १४ स्पर्धक या शोमध्ये सहभागी होणार आहेत.
-
सोशल मीडियावर शोचे प्रोमो प्रदर्शित केले जात आहेत ज्यावरून यंदाचं पर्व धमाकेदार होणार असल्याचं लक्षात येतं.
-
बिग बॉस हाऊसमध्ये यंदा सगळं नेहमीपेक्षा वेगळं असणार आहे. जसं की ४ बेडरूम, बिग बॉसचं स्वतः खेळणं आणि नो रुल पॉलिसी असं बरंच काही.
-
मागच्या १२ वर्षांपासूनची परंपरा सलमान खान पुढे चालवणार असून यंदाही तोच होस्टिंग करताना दिसणार आहे.
-
या शोसाठी सलमानने यंदा १००० कोटी रुपये एवढं मानधन घेतल्याचं बोललं जात आहे. मात्र बीबी प्रेस मीटिंगमध्ये सलमानने हे नाकारलं होतं.
-
मानधनाच्या दाव्यावर सलमान खान म्हणाला होता, “एवढं मानधन मला आयुष्यात कधीच मिळणार नाही. मिळालं तर मी कधीच काम करणार नाही. मला खूप खर्च आहेत. जसं की, वकिलांचे. या अफवांमुळे इनकम टॅक्सवाले मला भेटायला येतात.”
-
सलमानने हा शो बरीच वर्ष होस्ट केला आहे. याबद्दल तो म्हणाला, “मी कधी कधी खूप वैतागतो आणि शो करणार नाही असं सांगतो. पण मी नाहीच केलं तर आणखी कोणीतरी नक्कीच करेल.”
-
या पर्वाच्या विकेंड का वारची वेळही बदलण्यात आली आहे. यंदा विकेंड का वार शुक्रवार शनिवारी प्रसारित होणार आहे.
-
याआधी विकेंड का वार शनिवार आणि रविवारी प्रसारित होत होता. पण यावेळी यात बदल करण्यात आले असून यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
-
आतापर्यंतच्या पर्वांपेक्षा हे पर्व खूपच वेगळं असणार आहे. बिग बॉस हाऊसही ग्रँड आणि आलिशान असणार आहे.
-
यंदाचं बिग बॉस हाऊस ओमंग कुमार आणि विनिता कुमारने डिझाइन केलं आहे.
-
यंदा बिग बॉसच्या घरात, साजिद खान, टीना दत्ता, शालीन भनोट, मान्या सिंह, सौंदर्या शर्मा, निम्रत कौर, अंकित गुप्ता, प्रियंका चाहर चौधरी, सुंबुल तौकीर खान, श्रीजिता डे, गौतम सिंह विग, गोरी नागोरीस, शिव ठाकरे, अब्दु रोजिक सहभागी होणार आहेत.

हनुमान जयंतीनंतर ४ ग्रहांची होणार महायुती; ‘या’ राशींचा वाईट काळ संपणार? शनिदेवाच्या कृपेने मिळू शकतो पैसाच पैसा