-
छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शो असलेल्या बिग बॉस मराठीचे चौथे पर्व आज (२ ऑक्टोबर) पासून सुरु झाले आहे.
-
दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत. यंदाचं पर्व हे ऑल इज वेल या थीमवर आधारित आहे.
-
बिग बॉस मराठी सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची नाव समोर आली आहेत. हे स्पर्धक पुढील १०० दिवस प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे.
-
महेश मांजरेकरांनी घरात सहभागी झालेल्या स्पर्धकांचे अनोख्या स्टाइलमध्ये स्वागत केले आहे. यंदा घरातून चार स्पर्धक लगेचच बाहेर पडणार असल्याची घोषणा बिग बॉसने केली आहे. उद्याच्या भागात आपल्याला नक्की कोण बाहेर पडणार हे पाहता येणार आहे.
-
बहुप्रतीक्षित ‘बिग बॉस मराठी’चे चौथ्या पर्वाची पहिली स्पर्धक अभिनेत्री तेजस्विनी लोणारी ठरली. झी मराठी वाहिनीवरील ‘देवमाणूस’ मालिकेत तिने आमदार बाईची भूमिका साकारली होती.
-
‘बिग बॉस मराठी’चे चौथ्या पर्वातील दुसरा स्पर्धक अभिनेता प्रसाद जवादे ठरला आहे. त्याने ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘असे हे कन्यादान’ या मराठी मालिकेत काम केले आहे.
-
निखिल राजशिर्के हा बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात सहभागी होणारा तिसरा स्पर्धक आहे. निखिल राजशिर्के हा माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत झळकला होता.
-
‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात मिसेस मुख्यमंत्र्यांची जादू पाहायला मिळणार आहे. मिसेस मुख्यमंत्री या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री अमृता धोंगडे ही बिग बॉसच्या घरात सहभागी झाली आहे.
-
‘बिग बॉस मराठी’चे चौथ्या पर्वात एक वादग्रस्त आणि सातत्याने चर्चेत असणारा अभिनेता झळकणार आहे. अभिनेते किरण माने हे यात सहभागी होणार आहेत. मुलगी झाली हो या मालिकेतून ते घराघरात पोहोचले.
-
‘बिग बॉस मराठी’चे चौथ्या पर्वात सहावी सदस्य म्हणून समृद्धी जाधव सहभागी होणार आहे. समृद्धी ही स्प्लिट्सविला १३ मध्ये सहभागी झाली होती. यात तिने सर्वांचेच चांगलेच लक्ष वेधून घेतले होते.
-
‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात अभिनेता अक्षय केळकर सहभागी होणार आहे. निमा डेंजोप्पा या मालिकेतून तो घराघरात पोहोचला.
-
‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात शेवंता फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरची जादू पाहायला मिळणार आहे. रात्रीस खेळ चाले या मालिकेतून अपूर्वा नेमळेकर घराघरात लोकप्रिय झाली.
-
‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात योगेश जाधव हा देखील सहभागी होणार आहे. तो प्रोफेशनल फायटर आहे.
-
बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात सहभागी होणारी दहावी स्पर्धक यशश्री मसूरकर ठरली आहे. टूक टूक राणी अशी तिची ओळख आहे. ती मुंबईत राहणारी आहे.
-
‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात आरजे, लेखक अशी ओळख असलेली अमृता देशमुख सहभागी होणार आहे. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे.
-
‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात प्रसिद्ध डान्सर विकास सावंत सहभागी होणार आहे. त्याने आतापर्यंत अनेक रिअॅलिटी शोमध्ये काम केले आहे. अभिनेता सलमान खान ते सनी लिओनीबरोबरही तो झळकला आहे.
-
‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मेघा घाडगे सहभागी होणार आहे. प्रसिद्ध लावणीसम्राज्ञी अशी तिची ओळख आहे. तिने तिच्या लावणीच्या अदाकारीने सर्वांचेच चांगलेच लक्ष वेधून घेतले आहे.
-
‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात १४ व्या स्पर्धकाचे नाव समोर आले आहे. त्रिशूल मराठे हा बिग बॉसच्या चौथ्या पर्वात सहभागी होणार आहे. त्रिशूल मराठे हा सर्वसामान्यातून निवडून गेलेल्या स्पर्धकातील एक आहे.
-
‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात ‘माझ्या नवऱ्याची बायको’मधील माया फेम अभिनेत्री रुचिरा जाधव ही सहभागी होणार आहे. या मालिकेत तिने बोल्ड पण रोखठोक असलेल्या माया हे पात्र साकारले होते.
-
‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात डॉ. रोहित शिंदे सहभागी होणार आहे. रोहित हा रुचिरा जाधवचा बॉयफ्रेंड आहे. पण त्याला मॉडेलिंगची देखील विशेष आवड आहे. त्याने ‘मिस्टर इंडिया मॅन ऑफ द ग्लोब इंटरनॅशनल’साठी मॉडेलिंग केलं आहे.
-
सर्व फोटो – कलर्स मराठी/ फेसबुक
अखेर धनंजय मुंडेंचा राजीनामा, अजित पवारांची दोन वाक्यात प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले…