-
बहुप्रतीक्षित ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा रविवारी २ ऑक्टोबरपासून श्रीगणेशा झाला. हा कार्यक्रम घराघरात प्रसिद्ध आहे.
-
बिग बॉस मराठीचा ग्रँड प्रिमिअर सोहळा नुकताच पार पडला. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या १६ सदस्यांची नाव समोर आली आहेत.
-
यात मराठी सिनेसृष्टीतील चर्चेत असणारे ते वादग्रस्त ठरलेले चेहरेही पाहायला मिळत आहे. हे स्पर्धक आता पुढील १०० दिवस प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे.
-
बिग बॉस मराठीने काही दिवसांपूर्वी एका बोल्ड जोडीचा डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता.
-
ती जोडी नेमकी कोण असणार याबद्दलचा खुलासा झाला आहे.
-
बिग बॉसच्या चौथ्या पर्वात झळकणारी बोल्ड जोडी म्हणजे अभिनेत्री रुचिरा जाधव आणि तिचा बॉयफ्रेंड डॉ. रोहित शिंदे.
-
‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून रुचिरा जाधवला ओळखले जाते.
-
या मालिकेत तिने माया ही भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे ती चांगलीच प्रसिद्धीझोतात आली.
-
रुचिरा आणि रोहित हे दोघेही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. ते दोघेही नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात.
-
रुचिराने रोहितच्या वाढदिवसाचे औचित्य साधत प्रेमाची कबुली दिली होती.
-
रुचिरा आणि रोहित हे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.
-
रुचिराच्या बहिणीच्या लग्नातही त्याने हजेरी लावली होती. पण त्यावेळी रुचिराने ही बाब गुलदस्त्यात ठेवली होती.
-
रुचिराचा बॉयफ्रेंड रोहित हा पेशाने डॉक्टर आहे.
-
त्याला मॉडेलिंगची देखील विशेष आवड आहे.
-
‘मिस्टर इंडिया मॅन ऑफ द ग्लोब इंटरनॅशनल’साठी मॉडेलिंग केलं आहे.
-
त्याने काही ब्रँडसाठी रॅम्पवॉकही केले आहे.
-
रोहितला फिटनेसची विशेष आवड आहे. त्याचे अनेक फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
विशेष म्हणजे रोहितला भटकंती करण्याची फार हौस आहे.
-
या कार्यक्रमादरम्यान महेश मांजरेकर यांनी रोहित आणि रुचिराला तुमची ओळख कशी झाली याबद्दल प्रश्न विचारला.
-
‘प्रेम करायला शोधायची गरज नसते, ते आपोआपच भेटते’, असे उत्तर रोहितने दिले.
-
‘मी आणि रोहितने आम्ही एकत्र एक शूट केलं होतं. त्यासह काही मित्रही ओळखीचे होते’, असे रुचिराने म्हटले.
-
यंदाचं पर्व हे ऑल इज वेल या थीमवर आधारित आहे.
-
यंदा घरातून चार स्पर्धक लगेचच बाहेर पडणार असल्याची घोषणा बिग बॉसने केली आहे. उद्याच्या भागात आपल्याला नक्की कोण बाहेर पडणार हे पाहता येणार आहे.

‘ठरलं तर मग’मध्ये एन्ट्री घेणार ‘हा’ लोकप्रिय अभिनेता! यापूर्वी स्पृहा जोशीच्या मालिकेत केलंय काम, कोणती भूमिका साकारणार? पाहा प्रोमो