-
प्रियांका चोप्रा आज जागतिक स्तरावरची लोकप्रिय अभिनेत्री बनली आहे.
-
अलीकडेच प्रियांका चोप्राने डेमोक्रॅटिक नॅशनल कमिटीच्या वुमन लीडरशिप फोरम कॉन्फरन्समध्ये अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस यांच्याशी संवाद साधला.
-
प्रियांका चोप्राने वॉशिंगटन येथे कमला हॅरिस यांची मुलाखत घेतली.
-
प्रियांका चोप्राने स्वतःला आणि कमला हॅरिस यांना ‘भारताच्या कन्या’ असे संबोधून त्यांच्यातील साम्य अधोरेखित केलं.
-
प्रियांका आणि कमला हॅरिस यांनी स्त्री साक्षरता आणि स्रिया विविध क्षेत्रात मिळवत असलेल्या यशाबद्दल चर्चा केली.
-
“पूर्वी लोकांनी स्त्रिशक्तीला कमी लेखले. स्त्रियांचे बोलणे मनावर घेतले जायचे नाही, तसेच त्यांना गप्प केले जायचे. पण आज आपण सगळ्या स्त्रिया एकत्र येऊ शकतो, जे चुकीचं आहे त्याला सुधारू शकतो,” असं प्रियांका म्हणाली.
-
“मी अमेरिकेत मतदान करू शकत नाही. पण माझा नवरा करू शकतो आणि एक दिवस माझी मुलगीही करेल,” असेही तिने सांगितले.
-
आजच्या घडीला स्त्रिया विविध क्षेत्रात करत असलेलं कार्य हे निश्चितच अभिमानास्पद असल्याचं त्या दोघी म्हणाल्या.
-
या मुलाखतीबद्दल वाचून चाहत्यांच्या मनात प्रियांकाबद्दल आणखीनच अभिमान निर्माण झाला आहे. या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव करत नेटकरी प्रियांकाचे कौतुक करत आहेत.
![Devendra Fadnavis Statement on Ladki Bahin Yojana](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/DF2.jpg?w=300&h=200&crop=1)
Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना मिळालेला निधी…”