-
बहुप्रतिक्षीत ‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. छोट्या पडद्यावरून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अमृता देशमुख यंदाच्या पर्वात सहभागी झाली आहे.
-
‘आई कुठे काय करते’ मालिकेत यशची भूमिका साकारणारा अभिनेता अभिषेक देशमुखशी अमृताचं खास नातं आहे.
-
अमृता आणि अभिषेक सख्खे भाऊ-बहीण आहेत.
-
झी युवा वाहिनीवरील ‘फ्रेशर्स’ मालिकेतून अमृताला प्रसिद्धी मिळाली. या मालिकेत तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
-
‘तुमचं आमचं सेम असतं’, ‘मी तुझीच रे’ या मालिकांतून अमृताने अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडली.
-
मालिकांबरोबरच अमृता रुपेरी पडद्यावरही झळकली आहे. ‘स्वीटी सातारकर’ या चित्रपटात तिने प्रमुख भूमिका साकारली होती.
-
अमृता अभिनयाप्रमाणेच तिच्या आवाजासाठीही ओळखली जाते. ती रेडिओ जॉकीही आहे.
-
अमृता सोशल मीडियावर सक्रिय असून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
-
तिचे इन्स्टाग्रामवर ३ लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत.
-
अनेकदा अमृता तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
‘बिग बॉस’च्या घरात अमृताला पाहिल्यावर तिच्या चाहत्यांनाही आनंद झाला आहे.
-
अमृता ‘बिग बॉस’च्या घरात १०० दिवस टिकून राहण्यासाठी कोणत्या युक्त्या वापरणार, हे पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.
-
‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाची ट्रॉफी अमृता घेऊन येणार का?, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
-
(सर्व फोटो : अमृता देशमुख/ इन्स्टाग्राम)

IND vs PAK: “माझी विकेटनंतर सेलिब्रेट करण्याची…”, गिलला बोल्ड केल्यानंतर भुवई उंचावणाऱ्या पाकिस्तानच्या अबरारचं मोठं वक्तव्य; सामन्यानंतर काय म्हणाला?