-
‘बिग बॉस हिंदी’चं १६वं पर्व १ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हे पर्व बॉलिवूड अभिनेता सलमान खान होस्ट करत आहे.
-
या पर्वात बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक साजिद खानही स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. १६वे सदस्य म्हणून ‘बिग बॉस’च्या घरात त्यांची एन्ट्री झाली.
-
साजिद खान यांचे वडील कामरान खानही अभिनेता होते. परंतु, त्यांना बॉलिवूडमध्ये करिअर करण्यात यश मिळालं नाही.
-
साजिद खान सहा वर्षांचे असता त्यांचे आई-वडील एकमेकांपासून वेगळे झाले. नंतर दारुच्या व्यसनाने त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. तेव्हा ते अवघे १४ वर्षांचे होते.
-
वडिलांच्या निधनामुळे त्यांच्या शिक्षणावरही परिणाम झाला. साजिद खान दहावीत तीनदा नापास झाले होते.
-
एक रात्र तुरुंगवासही भोगला असल्याचा खुलासा एका मुलाखतीदरम्यान साजिद खान यांनी केला होता.
-
रात्री मित्रांबरोबर चित्रपट पाहिल्यानंतर ते रेल्वे रुळावरून चालत घरी येत होते. तेव्हा पोलिसांनी त्यांना पकडले आणि एक रात्र जेलमध्ये ठेवले होते.
-
साजिद खान दिग्दर्शकासह कोरिओग्राफर आणि निर्मातेही आहेत. परंतु, त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात एका टीव्ही शोचा सूत्रसंचालक(होस्ट) म्हणून केली होती.
-
कॉलेजमध्ये शिकत असताना ते पार्टी आणि कार्यक्रमांत डीजेदेखील वाजवायचे.
-
‘इंडियाज गॉट टैलेंट’, ‘नच बलिए’च्या पाचव्या आणि सहाव्या पर्वाचे ते परीक्षक होते.
-
२००६ साली त्यांनी ‘डरना जरुरी है’ चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्यांनी दिग्दर्शित केलेले ‘हे बेबी’, ‘हाऊसफुल’, ‘हाऊसफुल २’ चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले होते. परंतु, ‘हिम्मतवाला’ आणि ‘हमशकल्स’ या चित्रपटांमुळे त्यांच्या करिअरला उतरती कळा लागली.
-
२०१८ मध्ये त्यांच्यावर महिलांचे शोषण करण्याचा आरोप लावण्यात आला होता. साजिद खान त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत राहिले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसबरोबर त्यांचं नाव जोडलं गेलं होतं.
-
मीडिया रिपोर्टनुसार, हाऊसफुल चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ते दोघे एकमेकांना डेट करत होते. परंतु, २०१३ मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं.
-
साजिद खान यांना बिग बॉसच्या घरात पाहून चाहतेही अवाक आहेत. आता या पर्वाच्या ट्रॉफीवर ते नाव कोरणार का?, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (सर्व फोटो : साजिद खान/ इन्स्टाग्राम)
महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन