-
बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी अभिनेता अली फजल आणि रिचा चड्ढा लग्नबंधनात अडकले आहेत.
-
लखनौमध्ये मित्रपरिवार आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत विवाहबंधनात अडकून त्यांनी नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे.
-
२०१३ साली ‘फुकरे’ या चित्रपटाच्या सेटवर ते पहिल्यांदा भेटले होते. तेव्हापासूनच दोघे डेट करत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या.
-
पाच वर्षांहून अधिक काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर आता ते विवाहबंधनात अडकले आहेत.
-
लग्नासाठी रिचाने ऑफ व्हाइट रंगाचा भरजरी शरारा ड्रेस परिधान केला होता. खड्यांच्या ज्वेलरीने तिने खास लूक केला होता.
-
अली फजल डिझायनर शेरवानीमध्ये राजबिंडा दिसत होता.
-
रिचा चड्ढा आणि अली फजलने त्यांच्या लग्नसोहळ्यातील फोटो ‘रिअली’ हॅशटॅग वापरून सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
‘एक दौर हम भी है, एक सिलसिला तुम भी हो’ असं कॅप्शन त्यांनी या फोटोंना दिलं आहे.
-
रिचा चड्ढा-अली फजल यांच्या शाही लग्नसोहळ्यातील खास फोटो.
-
रिचा चड्ढा-अली फजल यांच्या मेहेंदी सोहळ्यातील फोटो.
-
मेहंदी सोहळ्यासाठी रिचाने ऑफ शोल्डर लेहेंगा परिधान केला होता.
-
तर अलीने पांढऱ्या रंगाच्या शेरवानीत खास लूक केला होता.
-
रिचा चड्ढा-अली फजल यांच्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
-
(सर्व फोटो : रिचा चड्ढा/ इन्स्टाग्राम)

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीचे तीन ठार; एक बालक गंभीर जखमी