-
दाक्षिणात्य चित्रपटाचा हिंदी रिमेक ही गोष्ट आपल्यासाठी नवीन नाही. मात्र नुकताच प्रदर्शित झालेला ‘विक्रम वेधा’ या हिंदी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतर हिंदी रिमेकच्या तुलनेत चांगली कमाई केली आहे.
-
हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांच्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १२ कोटी एवढी कमाई केली आहे. गेल्या काही महिन्यात प्रदर्शित झालेल्या काही हिंदी रिमेकला या चित्रपटाने मागे टाकलं आहे.
-
तामीळ चित्रपट ‘जिगरथंडा’चा हिंदी रिमेक ‘बच्चन पांडे’ बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला होता.
-
अक्षय कुमारसारखा मोठा स्टार या चित्रपटात असूनही हा एक मोठा फ्लॉप होता.
-
अक्षय कुमारच्या चित्रपटा पाठोपाठ तेलुगू चित्रपट ‘जर्सी’चा हिंदी रिमेकही चांगलाच आपटला होता.
-
या चित्रपटात शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर हे मुख्य भूमिकेत होते.
-
तेलुगू चित्रपट ‘मिडल क्लास अब्बाई’च्या हिंदी रिमेकमध्ये म्हणजेच ‘निकम्मा’मध्ये शिल्पा शेट्टी दिसली होती. हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता.
-
या चित्रपटात अभिनेत्री भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यु दसानी मुख्य भूमिकेत होता.
-
दाक्षिणात्य ब्लॉकबस्टर चित्रपट ‘हीट’च्या रिमेकमध्ये राजकुमार राव आणि सान्या मल्होत्रा मुख्य भूमिकेत होते, पण हा ‘हीट’ मात्र बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.
-
‘फॉरेस्ट गंप’ या हॉलिवूडच्या चित्रपटाचा रिमेक ‘लाल सिंग चड्ढा’ची चांगलीच चर्चा झाली. या चित्रपटाला बॉयकॉट ट्रेंडचाही सामना करावा लागला.
-
आमीर खानच्या कारिकीर्दीतला हा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट ठरला.
-
तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप यांचा एका स्पॅनिश चित्रपटाचा रिमेक ‘दोबारा’देखील बॉक्स ऑफिसवर सपशेल आदळला. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ