-
‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या मराठी मालिकेतून प्राजक्ता माळी घराघरात पोहोचली.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचं ती सुत्रसंचालन करते. इतकंच नव्हे तर आपल्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ती लंडनलाही गेली होती.
-
आता लंडनहून भारतात परतल्यानंतर पुन्हा एकदा ती आपल्या कामाला लागली आहे.
-
आपल्या आवडत्या अभिनेत्रीची लाइफस्टाइल नेमकी कशी आहे? हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. आता तिच्या घराचा व्हिडीओ समोर आला आहे.
-
सोनी मराठी वाहिनीच्या इन्स्टाग्राम पेजद्वारे प्राजक्ताच्या घराचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये ती आपलं घर कसं आहे? हे दाखवताना दिसत आहे.
-
प्राजक्ताचं घर तिच्या चाहत्यांनाही आवडलं आहे. तिच्या घरामधील सगळ्यात लक्षवेधी गोष्ट म्हणजे प्राजक्ताला मिळालेले पुरस्कार.
-
तिने आपल्या घराच्या हॉलमध्ये आपल्याला मिळालेले प्रत्येक पुरस्कार ठेवले आहेत.
-
इतकंच नव्हे तर तिला वाचनाची प्रचंड आवड आहे हे तिच्या घराचे फोटो पाहिल्यानंतर स्पष्टपणे दिसून येतं.
-
हॉलमध्येच तिने बऱ्याच प्रकारची पुस्तकं ठेवली असल्याचं दिसत आहे.
-
त्याचबरोबरीने हॉलला लागूनच तिचं स्वयंपाक घर आहे. तिचं छोटसं स्वयंपाक घर अगदी सुंदररित्या तिने सजवलं आहे.
-
प्राजक्ताने स्वयंपाक घराला लागून जेवणाचा टेबल तयार करून घेतला आहे. पण तिच्या म्हणण्यानुसार प्राजक्ता या टेबलवर सतत काम करत असते. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
Video : जीव महत्त्वाचा की अहंकार? अँब्युलन्सला रस्ता देण्यासाठी बसने केले कारला ओव्हरटेक, पण पुढे जे घडले…; पुण्यातील एसबी रोडवरील व्हिडीओ व्हायरल