-
बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक म्हणून माधुरी दीक्षितला ओळखले जाते.
-
आपल्या सौंदर्याने आणि नृत्याने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी ‘धक धक गर्ल’ अशीही तिची ओळख आहे.
-
माधुरी दीक्षितने आतापर्यंत अनेक हिट चित्रपटात काम केले आहे.
-
सध्या माधुरी ही ‘झलक दिखला जा’ या कार्यक्रमात परिक्षक म्हणून काम करत आहे.
-
नुकतंच माधुरी दीक्षितने मुंबईतील वरळी परिसरात एक अलिशान घर खरेदी केलं आहे. यामुळे ती चर्चेत आली आहे.
-
माधुरी दीक्षित आणि तिचे पती श्रीराम नेने यांनी सुपर प्रीमियम रेजिडेंशियल प्रोजेक्ट इंडियाबूल्स ब्लू या ठिकाणी नवीन घर खरेदी केले आहे.
-
या टॉवरमध्ये ५३ व्या मजल्यावर त्या दोघांचे घर आहे.
-
माधुरीचे हे नवीन घर ५,३८४ स्क्वेअर फूट इतके आहे. या घरातून समुद्राचा नजाराही पाहता येतो.
-
या घराचे रजिस्ट्रेशन २८ सप्टेंबर २०२२ रोजी झाले होते.
-
यात एक मोठा स्विमिंग पूल, फूटबॉल ग्राऊंड, जिम, स्पा, क्लब यांसारख्या अनेक अत्याधुनिक सोयी सुविधा पाहायला मिळत आहेत.
-
घराबरोबर तिला सात गाड्यांसाठीचे पार्किंगही देण्यात आले आहेत.
-
माधुरी दीक्षितने खरेदी केलेल्या नव्या घराची किंमत साधारण ४८ कोटी रुपये असल्याचे बोललं जात आहे. या घराची किंमत प्रति स्क्वेअर फूट ९० हजार रुपये आहे.
-
नवीन घर खरेदी केल्यानंतर सध्या माधुरी ही प्रचंड आनंदी असल्याचे पाहायला मिळत आहे.
-
दरम्यान माधुरी दीक्षितच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर सध्या ती झलक दिखला जा यात दिसत आहे.
-
काही दिवसांपूर्वी तिची प्रमुख भूमिका असलेली ‘फेम गेम’ ही वेबसीरीज प्रदर्शित झाली होती. याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. (सर्व फोटो – माधुरी दीक्षित, इंडियाब्लूस ब्लू इस्टेट अँड क्लब/ इन्स्टाग्राम)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख