-
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच आई होणार आहे. गरोदर असल्याची बातमी दिल्यापासून ती कायमच चर्चेत आहे.
-
नुकतंच आलिया भट्टच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला.
-
कपूर कुटुंबाकडून आलियाच्या डोहाळे जेवणाची जय्यत तयारी करण्यात आली होती.
-
आलियाच्या डोहाळे जेवणाचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
-
आलियाने डोहाळे जेवणादरम्यान पिवळ्या रंगाचा अनारकली ड्रेस परिधान केला होता. यात आलिया फारच सुंदर दिसत होती.
-
आलियाची खास मैत्रीण आकांक्षा रंजन हिने तिच्या बेबी शॉवरचे फोटो शेअर केले आहेत.
-
यावेळी आलियाच्या चेहऱ्यावर प्रेग्नन्सी ग्लोदेखील पाहायला मिळत आहे.
-
आकांक्षाबरोबर रिद्धीमा कपूरनेही इन्स्टाग्रामवर या कार्यक्रमाचे अनेक फोटो शेअर केले आहेत.
-
आलियाच्या या डोहाळे जेवणासाठी कपूर कुटुंब आणि भट्ट कुटुंब एकत्र आले होते. यात करिश्मा कपूर, रिद्धीमा कपूर, नीतू कपूर, शाहीन भट्ट, आकांक्षा रंजन असे अनेकजण दिसत आहेत.

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती