-
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच आई होणार आहे. गरोदर असल्याची बातमी दिल्यापासून ती कायमच चर्चेत आहे.
-
नुकताच आलिया भट्टच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला.
-
अगदी पारंपरिक पद्धतीने हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
-
गेले अनेक दिवस कपूर आणि भट्ट कुटुंब मिळून आलियाच्या दोहळेजवणाच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी करत होते.
-
आलियाच्या या डोहाळे जेवणासाठी कपूर कुटुंब आणि भट्ट कुटुंब एकत्र आले होते. यात करिश्मा कपूर, रिद्धीमा कपूर, नीतू कपूर, शाहीन भट्ट, आकांक्षा रंजन असे अनेकजण दिसत आहेत.
-
यावेळी आलियाच्या सगळ्या मैत्रिणी आवर्जून आल्या होत्या.
-
आलियाने डोहाळे जेवणादरम्यान पिवळ्या रंगाचा अनारकली ड्रेस परिधान केला होता. यात आलिया फारच सुंदर दिसत होती.
-
आलियाने तिच्या डोहाळे जेवणाचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
आता कपूर आणि भट्ट कुटुंबीयं रणबीर आणि आलियाच्या बाळाच्या आगमनासाठी आतुर असल्याचे या फोटोंमधून दिसत आहे.
शेवटी आईची माया! मुलांबरोबर राहण्यासाठी ‘ही’ महिला रोज घर ते ऑफिससाठी करतेय विमान प्रवास