-
सध्या राज्यात फक्त दसरा मेळाव्याची चर्चा सुरु आहे. शिंदे गटाचा पहिलाच दसरा मेळावा बुधवारी वांद्रे-कुर्ला संकुलात पार पडला.
-
तर दुसरीकडे हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केल्यापासून शिवाजी पार्क या ठिकाणी शिवसेनेचा पारंपारिक दसरा मेळावा पार पडला.
-
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात वाकयुद्ध पाहायला मिळाले. विविध मुद्दयांवरुन केलेली खोचक टीका, टोलेबाजी यामुळे हे दोन्ही दसरा मेळावे फारच गाजले.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यासाठी अनेक कलाकारांनीही उपस्थिती दर्शवली. त्यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले.
-
या दसरा मेळाव्याला गायक अवधूत गुप्ते आणि स्वप्निल बांदोडकरने हजेरी लावली.
-
या दसरा मेळाव्यात अवधूत गुप्तेंनी शिवसेना शिवसेना हे गाणं सादर केले. नव्या जोमात हे गाणं सादर झाल्याने हजारो शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला.
-
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमातही ते हजर होते. यावेळी त्यांनी लोकनाथ हे गाणं गायलं होतं.
-
या दोन्हीही कार्यक्रमानंतर अवधूत गुप्ते शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र नुकतंच इन्स्टाग्रामवर अवधूत गुप्तेंनी एक पोस्ट शेअर केली आहे.
-
यात त्यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिले. ‘मी तुमच्या गटाचा !’ असे त्यांनी या पोस्टच्या सुरुवातीला म्हटले.
-
“रसिक मायबाप , BKC वर काल दरऱ्यानिमित्य झालेल्या मेळाव्यात मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेंच्या आमंत्रणानुसार ‘एक गायक म्हणून’ दोन गाणी सादर केली!”
-
“या पार्शवभूमीवर गैरसमजातून काही प्रसारमाध्यमांनी मी “शिंदे गटात प्रवेश ” केल्याच्या बातम्या दिल्या.”
-
“माझ्याकडे अद्याप कोणत्याही पक्षाचं साधं प्राथमिक सदस्यत्व पण नाही. तसेच मी कोणत्याही पक्षात किंवा गटात प्रवेश केलेला नाही.”
-
“तुम्ही माझा प्रेक्षकवर्ग, चाहते , फॉलोवर्स हे माझे मायबाप आहात आणि तुम्हाला ह्या गोष्टीच स्पष्टीकरण देणं हे मी माझं उत्तरदायित्व समजतो!”
-
“मी ह्या आधीही वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या व्यासपीठावरून माझी कला सादर केल्याचे तुम्ही जाणताच!”
-
“माझ्या लेखी हा विषय इथेच संपला!”, असे अवधूत गुप्ते म्हणाला.
-
दरम्यान एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्याला अनेक कलाकार उपस्थित होते. यात अभिनेता प्रसाद ओक, दिग्दर्शक- लेखक प्रविण तरडे, ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे, गायक नंदेश उमप, अवधूत गुप्ते, स्वप्निल बांदोडकर यांनी हजेरी लावली.
स्वारगेट एस टी स्थानकात शिवशाही बसमध्ये प्रवासी तरुणीवर बलात्कार