-
केदार शिंदे यांचा आगामी ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट खूप चर्चेत आहे.
-
अभिनेता अंकुश चौधरी या चित्रपटात शाहीर साबळे यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
-
त्यासोबतच अभिनेत्री अश्विनी महांगडे हीदेखील या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.
-
नुकतीच या तिघांनी शाहीर साबळे यांच्या पसरणी गावाला भेट दिली.
-
पसरणी येथील भैरवनाथ मंदिर येथे शाहीर साबळे यांच्या फोटोचे अनावरण करण्यात आले.
-
यावेळी पसरणी मधील सर्व ग्रामस्थांनी केदार शिंदे आणि पूर्ण टीमचे कौतुक केलेच पण आशीर्वाद आणि शुभेच्छाही दिल्या.
-
अश्विनीने यावेळचे काही फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत.
-
“या सिनेमाशी माझेही नाते जोडले गेले आहे. सिनेमात काम करणे म्हणजे साक्षात पद्मश्री शाहीर साबळे (बाबा) यांच्या प्रती आदर, प्रेम व्यक्त करणे असे मी मानते,” असे तिने म्हटले आहे.
-
या फोटोच्या अनावरणाच्या वेळी एका कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.
-
या कार्यक्रमात केदार शिंदे यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं.
-
या चित्रपटाची पटकथा आणि संवाद प्रतिमा कुलकर्णी यांचे आहेत. तर या चित्रपटाला संगीत अजय- अतुल यांचं असणार आहे.
-
पुढच्या वर्षी म्हणजे २८ एप्रिल २०२३ रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

महिलांनो आता मेथीची भाजी निवडायचं टेन्शन कायमचं गेलं; या भन्नाट ट्रीकनं ५ मिनिटांत मेथी साफ, VIDEO पाहून अवाक् व्हाल