-
मराठी चित्रपटसृष्टीतील ‘अप्सरा’ अशी ओळख असलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने अल्पावधीतच अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली.
-
सोनाली सौंदर्य आणि तिच्या नखरेल अदांनी चाहत्यांना कायमच भूरळ पाडत असते. नुकतंच सोनालीने साडीत फोटोशूट केलं आहे.
-
फोटोशूटसाठी तिने ‘शुभदा डिझाइन स्टुडिओ’ची लिंबूचे प्रिंट असलेली पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे.
-
हॉल्टर नेक बॅकलेस ब्लाऊज परिधान करत हटके लूक केला आहे.
-
मोकळ्या केसांनी स्टाइल आणि साजेसा मेकअप करत सोनालीने फोटोसाठी पोझही दिल्या आहेत.
-
सोनालीचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत असून या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा पाऊस पाडला आहे.
-
काही नेटकऱ्यांना सोनालीची हटके फॅशन पाहून कमेंट करण्याचा मोह आवरता आलेला नाही. एका नेटकऱ्याने तिच्या फोटोवर कमेंट करत “आता लिंबू महाग होणार”, असं म्हटलं आहे.
-
सोनालीच्या ‘पांडू’ चित्रपटातील गाण्यावरूनही एकाने कमेंट केली आहे. ‘केळीवाली’ या गाण्यावरून एका चाहत्याने “तुमच्या फॅमिलीत लिंबूवालीला घेणार का?”, अशी मजेशीर कमेंट केली आहे.
-
सोनालीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
-
सध्या सोनाली ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत आहे.
-
(सर्व फोटो : सोनाली कुलकर्णी/ इन्स्टाग्राम)
Harshwardhan Sapkal : रवींद्र धंगेकर पक्ष सोडणार असल्याची चर्चा, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले, “ते कालही…”