-
बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान बॉलिवूडच्या लोकप्रिय जोड्यांपैकी एक मानले जातात.
-
८ ऑक्टोबर १९७० रोजी दिल्लीमध्ये जन्मलेली गौरी खान आज ५२ वा वाढदिवस साजरा करत आहे.
-
गौरी खान आणि शाहरुख यांची लव्हस्टोरी यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. पण याशिवाय तिने बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
बॉलिवूडमध्ये गौरी खान अभिनेत्री म्हणून कार्यरत नसली तरीही तिचा मित्रपरिवार खूप मोठा आहे.
-
गौरी खानने आपल्या कामाच्या जोरावर २०१८मध्ये फॉर्च्यून इंडिया मासिकाच्या आघाडीच्या ५० शक्तिशाली महिलांमध्ये जागा मिळवली होती.
-
एक यशस्वी बिझनेसवूमन असलेली गौरी खान कोट्यवधीच्या संपतीची मालकीण आहे.
-
दिल्लीच्या पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या गौरी खाननं दिल्लीच्याच टॉप स्कूल आणि कॉलेजमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे.
-
जवळपास ८ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर गौरी खान आणि शाहरुखने १९९१ मध्ये लग्न केलं होतं.
-
लग्नानंतर गौरी शाहरुखसह मुंबईला आली आणि तिने त्याच्या करिअरसह स्वतःच्याही करिअरला आकार दिला.
-
यशस्वी बिझनेसवूमन असलेली गौरी खान शाहरुखच्या यशातही तेवढीच भागीदार आहे आणि याचा उल्लेख किंग खानने अनेक मुलाखतींमध्ये केला आहे.
-
एका मीडिया रिपोर्टनुसार शाहरुख खान आणि गौरी खान यांची एकत्र कमाई ७३०४ कोटी रुपये एवढी आहे.
-
गौरी खान देशातील प्रसिद्ध इंटीरियर डिझायनरपैकी एक आहे. ‘मन्नत’सह तिने बॉलिवूडच्या अनेक जोडप्यांची घरं सजवली आहेत.
-
मीडिया रिपोर्टनुसार गौरी खानची एकटीची एकूण संपत्ती १७२५ कोटी रुपये एवढी आहे.
-
याशिवाय ती रेड चिलीज प्रॉडक्शन हाऊसची को- फाउंडर आणि सह- निर्मातीही आहे. ज्याने ‘ओम शांति ओम’, ‘माय नेम इज खान’, ‘हॅप्पी न्यू ईयर’, ‘चेन्नई एक्सप्रेस’ साखरे हिट चित्रपट दिलेत.
-
काही काळापूर्वीच गौरी खानने ओटीटीवर स्वतःचा शो सुरू केला असून ‘ड्रीम होम्स विथ गौरी खान’ असं त्याचं नाव आहे. (फोटो साभार- गौरी खान इन्स्टाग्राम)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल