-
‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. ‘ऑल इज वेल’ अशी थीम असलेल्या यंदाच्या पर्वात पहिल्या कॅप्टन्सी पदासाठी टास्क खेळण्यात आला.
-
समृद्धी जाधव आणि तेजस्विनी लोणारी यांच्यात कॅप्टन्सी पदासाठी रंगलेल्या खेळात टास्कदरम्यान आक्रमक लढत पाहायला मिळाली.
-
यामध्ये समृद्धीने बाजी मारून यंदाच्या पर्वातील पहिल्या कॅप्टन्सी पदाचा बहुमान मिळवला.
-
‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वातील पहिली कॅप्टन ठरलेल्या समृद्धी जाधवबद्दल जाणून घेऊया.
-
समृद्धी मुळची पुण्याची आहे. तिचा जन्म २९ ऑक्टोबर १९९९ रोजी झाला.
-
पुण्यातच तिने शालेय शिक्षण घेतलं. नॅशनल स्कूल ऑफ टेक्नोलॉजीमधून तिने फॅशन कम्युनिकेशनमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलं आहे.
-
तिला नृत्य आणि गाण्याचीही आवड आहे. भरतनाट्यम नृत्यही ती शिकली आहे.
-
त्यानंतर मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी समृद्धी मुंबईत आली.
-
समृद्धी एमटीव्हीवरील ‘स्प्लिट्सव्हिला एक्स ३’मध्ये सहभागी झाली होती. या शोमुळे तिला लोकप्रियता मिळाली.
-
समृद्धी सोशल मीडियावरही सक्रिय असते. तिचे इन्स्टाग्रामवर दोन लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत.
-
अनेकदा तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
‘बिग बॉस’च्या घरातील पहिल्या दिवसापासूनच चर्चेत असलेल्या चेहऱ्यांपैकी समृद्धी एक आहे.
-
आता प्रेक्षकांवर छाप पाडून ‘बिग बॉस’च्या चौथ्या पर्वाची ट्रॉफी ती घेऊन जाणार का?, हे पाहावं लागेल.
-
(सर्व फोटो : समृद्धी जाधव/ इन्स्टाग्राम)
हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…