-
२०२२ मध्ये आत्तापर्यंत अक्षय कुमारचे ४ चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. येत्या काही दिवसांमध्ये त्याचा ‘राम सेतु’ हा या वर्षातला पाचवा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
-
अक्षय कुमार सध्या सोशल मीडिया फार सक्रिय झाला आहे. तो ‘राम सेतु’ या त्याच्या आगामी चित्रपटाबद्दलचे अपडेट्स या माध्यमाद्वारे देत असतो.
-
शुक्रवारी त्याने या चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर केले.
-
या चित्रपटामध्ये अक्षयसह नुसरत भरुचा आणि जॅकलिन फर्नांडिस यांनी काम केले आहे.
-
‘राम सेतु’चा ट्रेलर ११ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार असून हा चित्रपट २५ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
या चित्रपटाद्वारे सुप्रसिद्द तेलुगू अभिनेता सत्यदेव बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. खास सत्यदेवसाठी त्याने हा फोटो पोस्ट केला.
-
या बहुचर्चित चित्रपटासाठी अक्षय फार उत्सुक आहे. या फोटोखाली त्याने “‘राम सेतू’मध्ये अनेक रोमांचक आणि थरारक सीन्स आहेत. खूप दिवसांनी इतकी मजा आली” असे कॅप्शन दिले आहे.
-
त्याने ‘मकर’ या एक्सोसूटसह फोटो काढून इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. कॅप्शनमध्ये त्याने ‘खोल समुद्रात संशोधन करताना हा एक्सोसूट फार महत्त्वाचा असतो’ असे म्हटले आहे.
-
चित्रपटाचे शूटींग संपल्यानंतर त्याने हा फोटो शेअर केला होता.
Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं