-
झी स्टुडियोजची निर्मिती असलेल्या आणि अभिजित देशपांडे यांच्या दिग्दर्शनाने सजलेल्या बहुप्रतीक्षित ‘हर हर महादेव’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.
-
महाराष्ट्राचे आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय इतिहासातील अनन्य साधारण व्यक्तिमत्व असलेल्या बाजीप्रभूंवर हा चित्रपट चित्रित करण्यात आला आहे.
-
‘हर हर महादेव’ या चित्रपटातील कलाकारांची पहिली झलक काही दिवसांपूर्वी समोर आली होती.
-
दमदार कलाकार आणि जबरदस्त गाणी असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाजाने होते.
-
झी स्टुडीओची निर्मिती असलेल्या या चित्रपटात तगडी स्टारकास्ट आपल्याला दिसणार आहे.
-
या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अभिनेता सुबोध भावे साकारणार आहे.
-
तर या चित्रपटात अभिनेत्री अमृता खानविलकरही एका ऐतिहासिक भूमिकेत दिसणार आहे.
-
गनिमांना कंठस्नान घालणाऱ्या बाजीप्रभू देशपांडे यांच्या पत्नी सोनाबाई देशपांडे यांची भूमिका ती साकारत आहेत.
-
अमृता खानविलकरबरोबर या चित्रपटात अभिनेत्री सायली संजीव पहिल्यांदाच ऐतिहासिक भूमिका साकरताना दिसत आहे.
-
मनातील दु:ख चेहऱ्यावर न दाखवता नेहमी स्मित हास्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनी ‘महाराणी सईबाई भोसले’ या भूमिकेत सायली संजीव दिसणार आहे.
-
तर या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत अभिनेते शरद केळकर झळकणार आहे.
-
स्वराज्याच्या लढाईत छत्रपती शिवाजी महाराजांना अखेरपर्यंत साथ देणारे चतुर, धाडसी, निष्ठावान साथीदार म्हणून आबाजी विश्वनाथ यांना ओळखले जाते.
-
या चित्रपटात आबाजी विश्वनाथ ही भूमिका अभिनेता हार्दिक जोशी साकारताना दिसणार आहे.
-
येत्या २५ ऑक्टोबरला दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.
-
अभिजीत देशपांडे यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.
-
तर ‘हर हर महादेव’ या चित्रपटाची निर्मिती सुनील फडतरे यांच्या श्री गणेश मार्केटिंग अँड फ्रेंड्स’ यांनी केली आहे.
-
हा चित्रपट मराठीसह हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषेतून प्रदर्शित होणार आहे.
Champions Trophy: जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर, भारताला मोठा धक्का; BCCIने बदली खेळाडूची केली घोषणा