-
बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री रेखा यांचा आज वाढदिवस आहे. अभिनयाच्या जोरावर बॉलिवूड गाजवणाऱ्या रेखा यांचं पूर्ण नाव भानूरेखा गनेशन असं आहे.
-
रेखा त्यांच्या सौंदर्याने चाहत्यांना भूरळ पाडतात. आजही त्यांच्या सौंदर्याचे लाखो दिवाने आहेत.
-
रेखा यांनी त्यांच्या अभिनय कौशल्याने अनेक गाणी अजरामर केली आहेत.
-
बालकलाकार म्हणून त्यांनी तेलुगु चित्रपटसृष्टीतून त्यांच्या अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली होती.
-
१९७० साली त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘उमराव जान’, ‘एक ही भूल’, ‘बसेरा’, ‘खून भरी मांग’, ‘सिलसिला’, ‘संसार’ असे एक सो एक हिट चित्रपट त्यांनी बॉलिवूडला दिले.
-
बिग बी अमिताभ बच्चन आणि रेखा यांचे प्रेमप्रकरणही बॉलिवूडमध्ये चर्चेत राहिलं होतं.
-
७०च्या दशकात अभिनय आणि सौंदर्याने बॉलिवूड गाजवणाऱ्या रेखा मात्र एका चित्रपटातील किसिंग सीन शूट करताना रडल्या होत्या.
-
‘अंजाना सफर’ या चित्रपटासाठी रेखा शूटिंग करत होत्या. या चित्रपटात अभिनेते बिस्वजीत चटर्जी मुख्य नायकाची भूमिका साकारत होते.
-
चित्रपटातील बिस्वजीत चटर्जी आणि रेखा यांच्यातील एका किसिंग सीनचं शूटिंग सुरू होतं. दिग्दर्शक राजा नवाथे यांनी अॅक्शन म्हणताच बिस्वजीत यांनी रेखा यांना मिठीत घेत किस करायला सुरुवात केली.
-
बिस्वजीत चटर्जी पाच मिनिटे रेखा यांना किस करत राहिले. या प्रसंगामुळे रेखा यांना रडू कोसळलं.
-
एकीकडे रेखा रडत होत्या तर दुसरीकडे सेटवरील सगळेजण आनंदाने टाळ्या आणि शिट्ट्या वाजवत होते.
-
त्यावेळी रेखा केवळ १५ वर्षांच्या होत्या. त्यांनी नुकतंच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं होतं.
-
चित्रपटातील या सीनची रेखा यांना कोणतीच कल्पना देण्यात आली नव्हती. त्यामुळे त्या स्तब्ध होत्या.
-
यासीर उस्मान यांच्या ‘रेखा: द अनटोल्ड स्टोरी’ कांदबरीत या प्रसंगाचा उल्लेख करण्यात आला आहे.
-
या प्रसंगानंतर बिस्वजीत यांनी दिग्दर्शकावर खापर फोडत ही त्यांचीच कल्पना आणि चूक असल्याचं म्हटलं होतं.
-
त्यानंतर दिग्दर्शकानेही अशाप्रकारे अचानक करण्यात आलेलं किसिंग सीनचं शूटिंग हे चित्रपटाच्या कथेची गरज असल्याचा खुलासा केला होता.
-
(सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)

IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO