-
जेव्हा बॉलिवूडमध्ये स्टाईलच्या गप्पा रंगतात तेव्हा रेखा यांचं नाव ओघाने येतंच. आज ६९ व्या वर्षात पदार्पण करताना अजूनही रेखा यांचे सौंदर्य चिरतरुण आहे.
-
भानुरेखा गणेशन हे रेखा यांचे मूळ नाव, कमी वयातच त्यांनी मनोरंजन सृष्टीत आपली छाप पाडली होती.
-
अभिनेता जेमिनी गणेशन व पुष्पावल्ली यांची रेखा यांनी तेलुगु चित्रपट इंति गुट्टू (1958), रंगुला रत्नम (1966) मधून बाल कलाकार म्हणून पदार्पण केले होते, आजवर रेखा यांनी १०० हुन अधिक चित्रपटात काम केले आहे.
-
रेखा या नेहमीच आपल्या भन्नाट लुकमुळे चर्चेत राहिल्या. नवनवीन प्रयोग करण्यास त्या कधीच घाबरल्या नाहीत.
-
त्यांचा पारंपरिक ते मॉडर्न असे दोन्ही अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत
-
७० व ८० च्या दशकात रेखा यांचे नाव अमिताभ बच्चन यांच्याशी जोडले गेले होते. ही न घडलेली प्रेमकहाणी आजही प्रसिद्ध आहे.
-
ऋषी कपूर व नीतू कपूर यांच्या लग्नात गेलेल्या रेखा या गळ्यात मंगळसूत्र व कुंकू लावून दिसल्या होत्या.
-
हिंदुस्थान टाइम्सला रेखा यांनी सांगितल्याप्रमाणे, तेव्हा त्या शूटिंगवरून थेट आल्या होत्या व मंगळसूत्र व कुंकू काढायला विसरल्या होत्या.
-
आपल्यावर कुंकू सुंदर दिसते त्यामुळे बाकी लोक काय म्हणतात याची आपल्याला पर्वा नाही असेही रेखा म्हणाल्या होत्या.
-
रेखा: द अनटोल्ड स्टोरी या पुस्तकातही त्यांनी हा प्रसंग सांगितला आहे.
-
याच कार्यक्रमात रेखा जया बच्चन व अमिताभ यांची लेक श्वेता यांच्यासमोर हात जोडून उभ्या राहिल्या होत्या. या फोटोने त्यावेळेस अनेकांचे लक्ष वेधले होते.
-
१९८२ च्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात रेखा यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते, यावेळी त्यांच्या सिंदूर (कुंकू) लोकविषयी तत्कालीन राष्ट्रपती नीलम रेड्डी यांनीही विचारणा केली होती.
-
आजही अनेकदा रेखा सुंदर कांजीवरम साड्या, जड दागिने व कुंकू लावूनच दिसून येतात व खरंच आजही अनेकांना आपल्या अदांनी घायाळ करतात.

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख