-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री भाग्यश्री मोटे आणि विजय पालांडे यांचा साखरपुडा सोहळा ९ सप्टेंबर रोजी पार पडला.
-
भाग्यश्रीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून फोटो शेअर करत ही बातमी तिच्या चाहत्यांना दिली. -
साखरपुड्याच्या रिसेप्शन सोहळ्यासाठी भाग्यश्रीने गुलाबी रंगाचा भरजरी लेहेंगा परिधान केला होता. तर विजय सूटमध्ये राजबिंडा दिसत होता.
-
भाग्यश्री-विजयच्या साखरपुडा सोहळ्यात बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनही त्याची गर्लफ्रेण्ड सबा आझादसह उपस्थित होता. भाग्यश्रीच्या साखरपुडा सोहळ्यात हृतिकला पाहून चाहतेही अवाक झाले.
-
भाग्यश्रीचा होणारा नवरा विजय पालांडे हा एक मेकअप आर्टिस्ट आहे.
-
हृतिक रोशनचेही अनेक मेकअप लूक त्याने डिजाइन केले आहेत. फोटोशूट, चित्रपट आणि जाहिरांतीसाठीही त्याने हृतिकचा मेकअप केला आहे.
-
म्हणूनच हृतिकने भाग्यश्री-विजयच्या साखरपुडा सोहळ्याला हजेरी लावली होती.
-
भाग्यश्रीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून साखरपुड्यातील रिसेप्शन सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा पाऊस पाडला आहे. कमेंट करत चाहत्यांनी भाग्यश्री-विजयला शुभेच्छाही दिल्या आहेत.
-
भाग्यश्रीने मराठीबरोबरच अनेक हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. ‘देवयानी’ मालिकेत तिने साकारलेल्या भूमिकेमुळे तिला लोकप्रियता मिळाली.
-
(सर्व फोटो : भाग्यश्री मोटे/ इन्स्टाग्राम)
IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO