-
बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन यांचा आज ८० वा वाढदिवस.
-
बॉलिवूडचे शहेनशहा म्हणून राज्य गाजवणाऱ्या अमिताभ बच्चन चार दशकांहून अधिक काळ मनोरंजनसृष्टी गाजवली.
-
बिग बी यांची लोकप्रियता आजही कायम आहे. अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक याबरोबरच अँग्री यंग मॅन म्हणूनही ओळखले जाते.
-
७० ते ८० च्या दशकात अमिताभ बच्चन यांनी अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले.
-
त्यांनी आतापर्यंतच्या कारकिर्दीत १८० हून अधिक चित्रपटात विविध भूमिका साकारल्या.
-
अमिताभ यांनी सिनेसृष्टीत पदार्पण करण्याच्या काळात ‘भुवन शॉ’, ‘सात हिंदुस्तानी’ हे चित्रपट केले. हे त्यांच्या कारकिर्दीतील अगदी सुरुवातीचे चित्रपट होते.
-
त्यानंतर ‘जंजीर’, ‘कुली’, ‘लावरिस’, ‘त्रिशूल’, ‘खून-पसीना’, ‘कालिया’, ‘अग्नीपथ’, ‘काला पथ्थर’, ‘डॉन’ या चित्रपटांमध्ये ते झळकले. विशेष म्हणजे त्यांचे सर्वच चित्रपट हे त्याकाळी प्रचंड हिट ठरले.
-
या सगळ्या चित्रपटांमधून वेळोवेळी बदलती समाजव्यवस्था, राजकारण, समाजकारण, आणि वाढती गुन्हेगारी यांचे चित्रण झाले.
-
त्यामुळे अमिताभ बच्चन यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील एक नवा प्रवाह निर्माण केला होता.
-
वयाच्या ८० व्या वर्षीही ते अफलातून अभिनय करताना दिसतात.
-
सध्या ते एका चित्रपटासाठी कोट्यावधी रुपये मानधन आकारतात.
-
पण त्यांनी पहिल्या चित्रपटासाठी किती मानधन घेतले होते तुम्हाला माहित आहे का?
-
कोट्यवधी रूपयांची कमाई करणाऱ्या महानायक अमिताभ बच्चन यांनी पहिल्या चित्रपटासाठी फक्त पाच हजार रूपये मानधन घेतले होते. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी याबद्दल खुलासा केला होता.
-
‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटातून अमिताभ यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
-
या चित्रपटासाठी त्यांना फक्त ५ हजार मानधन मिळालं होतं. बॉलिवूडमधील पदार्पणातील आपली ही पहिली कमाई असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले होते.
-
अमिताभ यांना ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटाने पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला.
-
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ आणि ‘प्रतीक्षा’ या बंगल्यांची किंमत आज २०० कोटींपेक्षा जास्त आहे.
-
तसेच चित्रपट-जाहिरात क्षेत्रातून ते कोट्यावधी रुपये कमावतात.
-
त्यानंतर १९८४ मध्ये ‘पद्मश्री’, २००१ मध्ये ‘पद्मभूषण’ आणि २०१५ मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
-
तसेच चौदा फिल्मफेअर पुरस्कारही त्यांच्या नावे आहेत. अभिनयाखेरीज पार्श्वगायक, चित्रपटनिर्माते आणि टीव्ही कार्यक्रम निर्माते म्हणूनही बच्चन यांनी काम केले आहे.
-
१९८४ ते १९८७ या काळात ते लोकसभेवर निवडूनही गेले होते.

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख