-
अक्षय कुमार:
‘सौगंध’ चित्रपटातून अक्षयने प्रमुख भूमिका साकारत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यातील भूमिकेसाठी त्याला ५१ हजार रुपये मिळाले होते. -
दीपिका पदुकोण:
दीपिका ही आताच्या घडीला सर्वात जास्त मानधन आकारणारी अभिनेत्री आहे. ‘ओम शांती ओम’ हा दीपिकाचा पहिला बॉलिवूड चित्रपट होता. या चित्रपटात काम करण्यासाठी तिने एकही रुपया मानधन आकारले नाही. -
शाहरुख खान:
१९९२ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ‘दीवाना’मधून शाहरुखने अभिनय क्षेत्रात करिअरची सुरुवात केली. शाहरुखला त्याच्या पहिल्याच सिनेमासाठी ४ लाख रुपये मिळाले होते. -
आमिर खान:
‘कयामत से कयामत तक’मधून आमिरने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटासाठी त्याला ११ हजार रुपये मिळाले होते. -
अमिताभ बच्चन:
१९६९ मध्ये अमिताभ बच्चन यांनी ‘सात हिंदुस्तानी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. या चित्रपटासाठी त्यांना ५००० रुपये मिळाले होते. -
सलमान खान:
‘मैंने प्यार किया’ हा सलमान खानचा पहिला बॉलिवूड चित्रपट. यासाठी त्याला ७५ हजार रुपये मिळाले होते. -
शाहिद कपूर:
‘इश्क विश्क’ या चित्रपटातून शाहिद कपूरने २००३ मध्ये बॉलिवूड पदार्पण केले. या चित्रपटासाठी त्याने १ लाख ५० हजार रुपये फी मिळाली होती. -
आलिया भट्ट:
आलियाने ‘स्टुडेंट ऑफ द ईयर’ चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. -
या चित्रपटासाठी तिला १५ लाख रुपये मिळाले असल्याचं तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”