-
झी मराठीवरील नवी मालिका ‘नवा गडी नवं राज्य’ ही अल्पावधीतच प्रसिद्ध झाली आहे.
-
हटके कथानकासह अनिता दाते व पल्लवी पाटीलचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
-
‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेची खासियत म्हणजे याची निर्मिती अभिनेत्री श्रुती मराठे हिने केली आहे.
-
श्रुतीसह तिचा पती गौरव घाटणेकर सुद्धा या मालिकेचा निर्माता आहे.
-
गौरव हादेखील एक उत्तम अभिनेता आहे. अभिनेत्याबरोबरच तो निर्माताही आहे.
-
‘ब्लॅक कॉफी प्रोडक्शन’ ही श्रुती व गौरवची चित्रपट निर्माती कंपनी आहे.
-
नुकत्याच पार पडलेल्या झी मराठी अवार्ड्स २०२२ मध्ये श्रुती- गौरवच्या ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेला अनेक नामांकने प्राप्त झाली होती.
-
झी मराठी अवार्ड्स २०२२ मध्ये ‘नवा गडी नवं राज्य’ ला अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत.
-
गौरव व श्रुतीने या पुरस्कारासह फोटो पोस्ट करून झी मराठी व प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
-
घाम, रक्त, अश्रू, पांढरे झालेले केस व न झोपता जागून काढलेल्या रात्री याचे हे फळ मिळाले आहे असे कॅप्शन गौरवने लिहिले आहे.
-
नवा गडी नवा राज्य मालिकेच्या टीमचे अवॉर्ड सोहळ्यातील फोटो सध्या सोशल मीडियावर चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
-
नवा गडी नवा राज्य मालिकेत सध्या आनंदीला रमाचे सत्य कळल्याने अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत.

Waqf Bill Controversy: “अलविदा नितीश कुमार..”, वक्फ विधेयक मंजूर होताच नितीश कुमारांच्या पक्षात बंडखोरी; नाराज नेत्यांचे राजीनामे