-
कतरिना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर यांचा ‘फोन भूत’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
गेल्या काही दिवसांपासून कतरिना या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यग्र आहे.
-
तिने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये वैवाहिक जीवनाबाबत खुलासा करत “लग्नानंतर सर्वकाही बदललं आहे. पण मी प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहे”, असे म्हटले.
-
पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीमध्ये कतरिना म्हणाली, “लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट असतो. लग्नानंतर तुम्हाला संपूर्ण जीवन तुमच्या जोडीदारासह घालवायचे असते. ही फार सुंदर बाब आहे असे मला वाटते.”
-
ती पुढे म्हणाली, “माझ्या आणि विकीच्या कामाच्या बिझी शेड्यूलमुळे आम्हाला एकमेकांना वेळ देणं फारसं शक्य होत नाही. पण या समस्येचा सामना बॉलिवूडमधील प्रत्येक जोडप्याला करावा लागतो.”
-
विकीबद्दल बोलताना तिने ‘तो खूप चांगला आहे. जोडीदाराच्या रुपात तो मला भेटला हे मी माझं भाग्य समजते’ असे विधान केले.
-
विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी डिसेंबर २०२१ मध्ये राजस्थानमध्ये लग्न केले. त्याआधी दीड-दोन वर्ष ते एकमेकांना डेट करत होते.
-
‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये कतरिनाने हजेरी लावली होती. तेव्हा तिने डेटिंग दरम्यानचे अनुभव शेअर केले.
-
ती म्हणाली, “आधी मी विकीला ओळखत नव्हते. मी त्याचे नाव ऐकून होतं. त्याला कधी भेटले नव्हते. पण जेव्हा आम्ही भेटलो, तेव्हा मी त्याच्या प्रेमात पडले.”

बापरे! मुंबई लोकलच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; पोलीस असूनही घडलं भयंकर, VIDEO पाहून धडकी भरेल