-
‘गुड लक जेरी’नंतर जान्हवी कपूर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
जान्हवीचा आगामी सिनेमा मिलीचे पोस्टर व टीझर सोशल मीडियावर लाँच झाले आहे.
-
जान्हवी कपूर सनी कौशल व मनोज पाहवा अशी स्टार कास्ट असणारा मिली हा चित्रपट ४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे
-
अलीकडेच या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान जान्हवीने आपली सर्वात मोठी खंत बोलून दाखवली.
-
आपल्याला स्टारकिड असल्याने काही विशेष हक्क किंवा अधिकार मिळत नाहीत, पण लोकांना हे समजूनच घ्यायचे नाही असे जान्हवीने गुडटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
-
मी काम करताना मेहनत घेत नाही असे सगळ्यांना वाटते पण मी सेटवर सर्वात जास्त कष्ट घेते हे अनेकांना कळत नाही याचे दुःख वाटते असेही जान्हवी म्हणाली.
-
मी कदाचित सर्वात सुंदर किंवा टॅलेंटेड नसेन पण कोणीही माझ्या कामाप्रती असलेल्या निष्ठेवर शंका घेऊ शकत नाही अशा शब्दात जान्हवीने टीकाकारांना सुनावले आहे.
-
यापूर्वीही जान्हवीची अनेकदा श्रीदेवीसह तुलना केली जात होती. जान्हवीला मात्र यामुळे अनेकदा संघर्षच करावा लागल्याचे ती म्हणते.
-
इतरांसाठी ती श्रीदेवी असली तरी ती माझी आई आहे, हे चाहत्यांनाही समजत नाही याबाबत जान्हवीने उघडपणे खेद व्यक्त केला होता.
-
दरम्यान जान्हवी कपूर हिच्या अभिनयासह बोल्ड लुक मुळे ती नेहमीच चर्चेत असते.
-
अलीकडेच कॉफी विथ करण मध्ये जान्हवीचा खेळकर अंदाजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.
-
जान्हवीचा आगामी चित्रपट मिली हा २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हेलन’ या मल्याळम चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे.
-
अभिनेत्री अॅना बेन हिने मल्याळम चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती ज्याचे खूप कौतुक झाले होते.
-
जान्हवी या चित्रपटाला न्याय देऊ शकणार का यासाठी आता काहीच दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
‘याचा रोल किती हा बोलतो किती?’ संतोष जुवेकर अक्षय खन्नासंदर्भातील ट्रोलिंगबद्दल म्हणाला, “माझं नशीब…”