-
अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी नुकतंच त्यांचा पहिला करवाचौथ साजरा केला.
-
कतरिना आणि विकी कौशलचा हा पहिलाच करवा चौथ असल्याने तो त्यांच्यासाठी फारच खास होता.
-
विशेष म्हणजे कतरिनाने तिच्या सासरच्या मंडळींसोबत अगदी पारंपारिक पद्धतीने करवा चौथ करण्यास प्राधान्य दिले.
-
कतरिनाने तिच्या इन्स्टाग्रामवर याबद्दलचे काही फोटो शेअर केले आहे.
-
यात विकी कौशल आणि त्याचे आई-वडील पाहायला मिळत आहे.
-
मोठ्या थाटामाटात त्या दोघांनी करवा चौथ साजरा केला असून विकीच्या आईनेही सूनेच्या पहिल्या करवा चौथसाठी जय्यत तयारी केली होती.
-
यावेळी विकी कौशलने क्रीम रंगाचा कुर्ता-पायजामा घातला आहे. तर कतरिनाने गुलाबी रंगाची सुंदर साडी परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे.
-
तसेच कतरिनाच्या कपाळावर टिकली, भांगेत कुंकू, हातात लाल बांगड्यांचा चुडा आणि गळ्यात मंगळसूत्र पाहायला मिळत आहे.
-
कतरिनाने या साजशृगांरात ती फारच गोड दिसत आहे. कतरिना आणि विकीने शेअर केलेले फोटो हे त्यांच्या मुंबईतील घरातील आहेत.
-
या फोटोवर अनेक कलाकरांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
-
अभिनेत्री प्रियांका चोप्राने यावर कमेंट केली आहे. ‘अभिनंदन खूप सुंदर’, असे प्रियांकाने म्हटले आहे.
-
तर करिश्मा कपूरने पहिल्या करवा चौथच्या शुभेच्छा, अशी कमेंट केली आहे.
-
तसेच श्वेता बच्चन, झोया अख्तर, शर्वरी वाघ, इलियाना यासारख्या अनेक अभिनेत्रींनी तिच्या या पोस्टवर हार्ट इमोजी शेअर केला आहे.
-
कतरिना आणि विकीने ९ डिसेंबर २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली. राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट या ठिकाणी ते विवाहबंधनात अडकले होते.

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख