-
अभिनेता रितेश देशमुखने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत स्वत:ची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे.
-
बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटात काम करणारा रितेश हा अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी करत आहे.
-
रितेश देशमुखने ‘लय भारी’ या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं.
-
त्यानंतर आता लवकरच तो ‘वेड’ या मराठी चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
रितेश देशमुख हा नेहमी स्पष्टवक्ता म्हणून ओळखला जातो. २०१३ मध्ये त्याने ‘बालक पालक’ आणि त्यानंतर ‘यलो’ या चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केले होते.
-
नुकतंच त्याने ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शन क्षेत्रातील पदार्पण, मराठी चित्रपटसृष्टी, हिंदी चित्रपटसृष्टी याबद्दल भाष्य केले.
-
यावेळी तो म्हणाला, “मला दिग्दर्शन क्षेत्राचे अनेक वर्षांपासून आकर्षण होते. पण मी अभिनय करत असल्यामुळे ते करण्याचे धाडस मला होत नव्हते.”
-
“पण गेल्या तीन-चार वर्षांत मी ते करु शकतो का? मला ते जमेल का याबद्दल मी विचार केला. त्यानंतर मी वेड हा चित्रपट दिग्दर्शित करण्याचे ठरवले.”
-
“महाराष्ट्र राज्य सिनेसृष्टीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. पण अनेक हिंदी चित्रपटसृष्टीच्या तुलनेत मराठी चित्रपटांना फार मोठा संघर्ष करावा लागतो.”
-
“मराठी चित्रपटांपेक्षा हिंदी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक पहिली पसंती देताना दिसतात.”
-
“त्यामुळे एकाच राज्यात हिंदी चित्रपटांबरोबर स्पर्धेत टिकून राहणे हे मराठी चित्रपटासांठी फार कठीण आहे.”
-
“अनेक चांगल्या मराठी चित्रपटांना दुय्यम स्थान मिळत असल्याने त्यांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरही याचा परिणाम होतो.”
-
“पण नागराज मंजुळेंचा सैराट, महेश मांजरेकरांना नटसम्राट यासारखे अनेक मराठी चित्रपट सुपरिहट झाले आहेत.”
-
“प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे आकर्षित करण्यासाठी राज्याला दरवर्षी किमान दोन चांगले मराठी चित्रपट निर्मिती करण्याची आवश्यकता आहे.”
-
“यामागे आपण तिसऱ्या वरुन दुसऱ्या आणि दुसऱ्या वरुन समान पातळीवर कसे जाऊ शकतो याबद्दल विचार करणे गरजेचे आहे.
-
“महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी आहे. त्यातील ९ ते १० कोटी प्रेक्षक हे मराठी भाषिक आहेत, असा मला ठाम विश्वास आहे”, असे रितेश देशमुख म्हणाला.
-
आपण प्रेक्षकांना कशाप्रकारे आकर्षित करु शकू याबद्दल आपल्याला विचार करणे गरजेचे आहे.”

‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक