-
‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री अंकिता लोखंडेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं.
-
अंकिता पती विकी जैनसह २०२१च्या डिसेंबरमध्ये विवाहबंधनात अडकली. लग्नानंतर अंकिताने पहिलीच करवा चौथ साजरी केली.
-
मित्रपरिवार आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत अंकिता-विकीच्या पहिल्याच करवा चौथचं जंगी सेलीब्रेशन करण्यात आलं.
-
फुलांनी सजावट करत त्यावर ‘अनवी की कहाणी’ असं लिहिण्यात आलं होतं.
-
अंकिता खास लाल रंगाच्या लेहेंग्यात नटली होती. तर विकीने राखाडी रंगाच्या ड्रेसमध्ये पेहराव केला होता.
-
अंकिताच्या करवा चौथ सेलिब्रेशनसाठी अभिनेत्री अभिज्ञा भावेही उपस्थित होती.
-
अंकिता-विकीच्या पहिल्या करवा चौथचा खास फोटो.
-
करवा चौथ निमित्ताने अंकिताने पती विकी जैनसाठी खास गाणंही गायलं.
-
‘आओ हुजुर तुमको सितारों मे’ हे गाऊन अंकिताने करवा चौथचा सण स्पेशल केला.
-
अंकिताने करवा चौथसाठी स्पेशल डान्सही केला.
-
तर विकी-अंकिताच्या डान्सने या सोहळ्याला चार चांद लावले.
-
अंकिता-विकीच्या करवा चौथ सोहळ्यामध्ये डिजेच्या तालावर ठुमकेही लावण्यात आले.
-
करवा चौथच्या स्पेशल सेलिब्रेशनचे फोटो अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरुन शेअर केले आहेत.
-
(सर्व फोटो : अंकिता लोखंडे/ इन्स्टाग्राम)
IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO