-
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान ही सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटींगसाठी लंडनमध्ये गेली आहे.
-
सध्या ती लंडनमधून तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे.
-
नुकतंच करिनाने तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे काही नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
-
यात ती तिचा लहान मुलगा जहांगीर अली खान म्हणजे जेहबरोबर पोज देताना दिसत आहे.
-
यावेळी करीनाने पांढऱ्या रंगाची हुडी, त्यावर डेनिम जॅकेट आणि पांढऱ्या रंगाचे शूज असा लूक केला आहे.
-
याबरोबरच तिने पोनीटेल बांधला असून डोळ्यावर काळ्या रंगाचा चष्मा लावला आहे.
-
तर जेहने काळ्या रंगाचे स्वेटर, त्यावर मॅचिंग पँट आणि काळ्या रंगाचा चष्मा लावला आहे.
-
यात तो फारच गोड दिसत असून त्या दोघा आई-मुलाच्या जोडीचे फोटो व्हायरल होत आहेत.
-
एका फोटोत करीना ही जेहचा हात पकडून उभी आहे. तर दुसऱ्या फोटो तो त्याच्या आईप्रमाणे पोज देत असल्याचे पाहायला मिळत आहे.
-
या फोटोला कॅप्शन देताना करीना म्हणाली, “मी माझ्या मुलाबरोबर काम करण्यासाठी निघालीय, पण त्यापूर्वी एक झटपट पोज..!”
-
करीनाच्या या फोटोवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. तर अनेकांनी या आई-मुलाच्या जोडीवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
-
अभिनेत्री आलिया भट्टने यावर कमेंट करत त्या दोघांनाही ‘सुपरस्टार’ असे म्हटले आहे. तर आलियाची आई सोनी राजदान हिने या फोटोवर मस्तच अशी कमेंट केली आहे.

‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स