-
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच आई होणार आहे. रणबीर कपूरशी विवाहबंधनात अडकल्यानंतर काहीच महिन्यांत आलियाने ही गूड न्यूज दिली.
-
नुकताच आलियाच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रमही पार पडला. अनेक सेलिब्रिटींनी या सोहळ्याला हजेरी लावली होती.
-
अनेकदा आलिया बेबी बंप फ्लॉन्ट करतानाही दिसून आली. तिचे बेबी बंप दाखवतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरलही झाले होते.
-
आता पहिल्यांदाच आलियाने मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.
-
प्रेग्नन्सीनंतर आलियाने ‘Eda Mama’ नावाचा मॅटर्निटी क्लोथ ब्रॅण्ड सुरू केला होता. तिच्या या ब्रॅण्डसाठीच आलियाने फोटोशूट केलं आहे.
-
स्वेटशर्टमध्ये आलियाने पोझ देत कॅज्युअल लूक केला आहे.
-
फोटोमध्ये प्रेग्नन्सी दरम्यान आलियाच्या चेहऱ्यावर आलेला ग्लो स्पष्ट दिसत आहे.
-
केशरी रंगाचा ड्रेस परिधान करत आलियाने बेबी बंप फ्लॉन्ट केला आहे.
-
डोक्यावर हॅट घालून गरोदरपणातही तिने हटके लूक केला आहे.
-
डेनिमच्या जम्पसूटमधील आलियाचा हा लूक फारच खास आहे.
-
बेबी बंप फ्लॉन्ट करत तिने फोटोसाठी पाऊटही केलं आहे.
-
फोटोशूटमधील काळ्या रंगाच्या ड्रेसमधील आलियाचा लूक लक्षवेधी ठरत आहे.
-
आलिया-रणबीरच्या बाळासाठी चाहते आतुर असून तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
-
(सर्व फोटो : आलिया भट्ट/ इन्स्टाग्राम)

लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर