-
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला राणादा आणि पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर हे दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.
-
सध्या त्या दोघांच्या घरी लगीनघाई सुरु आहे.
-
अलीकडेच हार्दिकने त्याच्या बहिणींनी त्याच्यासाठी केलेल्या केळवणाचा फोटो शेअर केला होता.
-
तर काही दिवसांपूर्वी अक्षया तिच्या मैत्रिणींसोबत बॅचेलर पार्टी करताना दिसली.
-
आपल्या आगामी प्रोजेक्ट्सची शूटिंग्समधून वेळ काढत ही दोघे लग्नाच्या खरेदीला लागली आहेत.
-
नुकतीच अक्षया लग्नात नेसणार असलेल्या साडीच्या विणकामाचा श्री गणेशा करण्यात आला.
-
काल अक्षया,हार्दिक, त्यांचे कुटुंबीय आणि काही खास मित्रमंडळी यांनी याठिकाणी जाऊन पहिला धागा विणला.
-
यावेळी हार्दिकनेही हातमागावर खास अक्षयसाठी पैठणी विणली.
-
यावेळी अभिनेत्री वीणा जगताप, अमोल नाईक, ऋचा आपटे या त्यांच्या खास मित्र मैत्रिणींनी हातमागावर या साडीचा धागा विणला.
-
या सगळ्यांनी पहिल्यांदाच हातमागावर साडी विणण्याचा अनुभव घेतल्याने त्यांच्या चेहऱ्यावर याचा आनंद दिसत आहे.
-
त्यामुळे अक्षया आणि हार्दिकच्या लग्नाची सगळ्यांना खूप उत्सुकता लागली आहे.
-
हे दोघे नक्की कोणत्या दिवशी बोहल्यावर चढणार याकडे त्यांच्या चंहत्यांचं लक्ष लागलं आहे.

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”