-
मराठी ‘बिग बॉस’च्या दुसऱ्या पर्वाचा शिव ठाकरे विजेता ठरला.
-
मराठी ‘बिग बॉस’मध्ये सहभाग घेण्यापूर्वी त्याने एमटीव्ही वाहिनीवरील ‘रोडिज’ शोमध्येही सहभाग घेतला होता.
-
पण मराठी ‘बिग बॉस’मुळे तो अधिक नावारुपाला आला.
-
त्याचं मराठी ‘बिग बॉस’च्या घरामध्ये अभिनेत्री विणा जगतापशी असलेलं नातं प्रचंड गाजलं. हा शो संपल्यानंतरही तो विणाला डेट करत होता.
-
आता हिंदी ‘बिग बॉस’च्या १६व्या पर्वामध्ये शिव सहभागी झाला आहे. यावेळी त्याने त्याच्या खासगी आयुष्याबाबत बरेच खुलासे केले.
-
आपल्याला याआधी १६९ गर्लफ्रेंड होत्या असंही तो म्हणाला.
-
पण तुम्हाला माहित आहे का? शिव अगदी सामान्य कुटुंबातील मुलगा आहे.
-
एमटीव्ही वाहिनीवरील ‘रोडिज’ शोच्या ऑडिशनदरम्यान त्याने आपल्या आयुष्याबाबत सांगितलं होतं.
-
तो म्हणाला, “माझ्या वडिलांचं पानाचं दुकान आहे. तिथे मी मदतीसाठी जायचो. मी व माझ्या बहिणीने मिळून पेपरही विकले आहेत.”
-
“माझा डान्स क्लासही आहे. त्यातून मिळणारे पैसे मी घरी देतो. तर काही मी स्वतःवर खर्च करतो.”
-
शिव ठाकरे आज स्वतःच्या मेहनतीने इथवर पोहोचला आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं