-
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा मृत्यूनंतर दोन वर्षांहून अधिक काळ उलटला आहे. मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या त्याच्या राहत्या घरात सुशांतचा मृतदेह आढळून आला होता.
-
अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने सुशांत सिंह राजपूतबद्दल भाष्य केले. यावेळी तिने त्याच्याबद्दलच्या अनेक आठवणीही ताज्या केल्या.
-
झी मराठीवरील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात अभिनेत्री प्रार्थना बेहरे सहभागी झाली होती.
-
यावेळी तिने पवित्र रिश्ता आणि अभिनेता सुशांत सिंह राजपूतबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्याबद्दल तिने याबद्दल भाष्य केले.
-
“मला सुरुवातीला सुशांत असे काही करु शकतो हे पटतच नव्हते. तो हे करुच शकत नाही. कारण ज्या सुशांतला मी ओळखायचे किंवा ज्याला आम्ही जवळून बघितलं होतं, त्याला आयुष्यात खूप काही काही करायचे होते.”
-
“मी, अंकिता आणि सुशांत आम्ही तिघांनी एकत्र खूप वेळ घालवला आहे. अनेकदा रात्री पॅकअॅप झाल्यानंतर आम्ही बँडस्टँडला जाऊन बसायचो.”
-
“मला अजूनही आठवतंय की तो शाहरुख खानच्या बंगल्याकडे पाहून म्हणायचा की एक दिवस मी याच्या बाजूला घर घेईन.”
-
“मी खरं सांगते की जेवढं त्याला चित्रपट करणं हे आवडायचं तेवढंच मलाही त्याची क्रेझ होती. आम्ही तासनतास यावर चर्चा करायचो.”
-
“त्याचा आणि माझा जन्म एकाच जानेवारी महिन्यातला. तोही विज्ञान शाखेत शिकलेला विद्यार्थी होता आणि मी पण.”
-
“त्याचा ‘काय पो छे’ आणि माझा ‘भटिंडा’ हा चित्रपट एकत्र प्रदर्शित झाला. अशा अनेक गोष्टी माझ्या आणि त्याच्या आयुष्यातील त्या फारच सारख्या होत्या.”
-
“आमची मैत्री फारच छान होती. अनेक गोष्टी मला त्याच्या आजही आठवतात. सुशांतबद्दल मी अजूनही आठवलं की खूप चिडते, त्याने हे का केल? बाकी करायला खूप काही होतं. पण स्वत:ला संपवणे हा शेवटचा मार्ग नव्हे.”
-
“मी गेल्या चार वर्षांपासून त्याच्या संपर्कात नव्हते.”
-
“अंकिताबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर तो फार वेगळं राहायला लागला. मी एकदा, दोनदा त्याला फोन करुन बोलण्याचा प्रयत्न केला होता.”
-
“कारण आमच्यात अंकिताचा विषय कायम असायचा आणि तिचा विषय निघाल्यानंतर त्याला बोलायला आवडायचे नाही. मला यावर नाही बोलायचे असे तो म्हणायचा.”
-
“पण १ जूनला पवित्र रिश्ताला १० वर्ष पूर्ण झाली होती आणि आम्ही एक ग्रुप बनवला होता.”
-
“त्यात सर्वजण होते फक्त सुशांत नव्हता. मी त्याच्या एका जवळच्या मित्राला सांगितले की त्याला अॅड कर ना.”
-
“त्यानंतर अंकितालाही सांगितले की त्याला अॅड करु तुला चालेल ना? त्यावर तिनेही करा असे म्हटले.”
-
“पण त्याला या ग्रुपमध्ये यायचे नव्हते, तसे त्याने सांगितले होते. त्याच्या १४ दिवसानंतर ही बातमी आम्हाला कळली.”
-
“जर तो त्यात अॅड झाला असता ना, तर त्याला त्याचे जुने मित्र, गप्पा हे सर्व सुरु झालं असतं आणि तो त्यातून बाहेर पडला असता.”
-
“तो कोणाशी तरी तो बोलला असता? काही तरी झालं असतं? त्यावेळी मला इतकं वाईट वाटतं की मी स्वत: पुढाकार घेऊन हे सर्व का केलं नाही?”
-
“मी एखादा फोन घेऊन मी ते करु शकली असती? जरी तो समोरुन आला नाही तरी मी करु शकले असते.”
-
“त्यामुळे त्या दिवसापासून मी एक गोष्ट ठरवली की सॉरी, थँक्यू आणि आय लव्ह यू हे मनात ठेवायचं नाही. सरळ बोलून टाकायचं”, असे तिने स्पष्ट भाषेत सांगितले.
Ram Navami 2025 Wishes : रामनवमीच्या मराठी शुभेच्छा पाठवा प्रियजनांना, वाचा एकापेक्षा एक हटके संदेश