-
‘झी मराठी’वरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका सध्या घराघरात लोकप्रिय आहे.
-
या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे हे दोघे प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे.
-
त्यासोबतच परीची भूमिका साकारणारी बालकलाकार मायरा वायकुळलाही विशेष पसंती मिळत आहे.
-
प्रत्येक नवीन ट्विस्टमुळे ही मालिका अधिकाधिक लोकप्रिय आणि प्रेक्षकांसाठी मनोरंजक बनत आहे.
-
प्रेक्षकांच्या आणि चाहत्यांच्या आग्रहाखातर पुन्हा भेटीला आलेली माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका एका नवीन वळणावर आली आहे.
-
पण आता सर्व काही सुरळीत सुरु असताना येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.
-
एकीकडे चौधरी कुटुंबात आनंदाची बातमी येणार आहे. तर दुसरीकडे या मालिकेला अपघाताचे ग्रहण लागणार आहे.
-
सध्या या मालिकेत मिथिला खूप आनंदात असते आणि ती गोड बातमी आजोबांना सांगायला जाते, तिथे मिथिलाचा अपघात होतो.
-
तर दुसरीकडे यश गाडी चालवत असताना सिम्मी त्याला ही अपघाताची बातमी सांगते. हे ऐकल्यावर यशलाही धक्का बसतो.
-
त्याचक्षणी यश आणि नेहाच्या गाडीचा अपघात होतो.
-
त्यामुळे येणाऱ्या भागात काय घडणार याची चर्चा होताना दिसत आहे.
Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल