-
मराठीमधील टॉपच्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये अभिनेत्री प्रार्थना बेहरेचं नाव आवर्जुन घेतलं जातं.
-
मराठी चित्रपटांमध्ये तिने उत्तमोत्तम काम करत कलाक्षेत्रामध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं.
-
‘पवित्र रिश्ता’ ही हिंदी मालिका तिच्यासाठी लकी ठरली. त्यानंतर मराठी मालिकांमध्ये तिने केलेलं काम प्रेक्षकांना कायमचं लक्षात राहणारं आहे.
-
सध्या ती झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेमुळे चर्चेत आहे.
-
पण तुम्हाला माहित आहे का? प्रार्थनाने पत्रकारितेचं शिक्षण घेतलं आहे. अभिनयक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी ती पत्रकार म्हणून काम करत होती.
-
झी मराठी वाहिनीवरील ‘बस बाई बस’ कार्यक्रमामध्ये प्रार्थनाने हजेरी लावली होती. यावेळी तिने या गोष्टीबाबत खुलासा केला.
-
तसेच अनुपम खेर, जॅकी श्रॉफ सारख्या अभिनेत्यांनी तिला तू अभिनय करायला हवास असा सल्ला त्यावेळी दिला होता.
-
प्रार्थना या कार्यक्रमामध्ये म्हणाली, “जॅकी श्रॉफ यांची पहिल्यांदाच मी मुलाखत घेतली तो क्षण मला आजही आठवतो. जॅकी श्रॉफ यांची मुलाखत घेतल्यानंतर मी माझ्या गाडीमध्ये येऊन बसत होती.”
-
“त्यावेळी त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं की, तू अभिनय केला पाहिजे. तर तेव्हा मला असं वाटलं असं कोण बोलतं? मी जे करत आहे त्यात मी खूप खूश आहे असं म्हणून मी जॅकी श्रॉफ यांचा फोन ठेवला.”
-
“त्यानंतर अनुराग बासू यांची मी मुलाखत घेतली होती. संपूर्ण मुलाखत झाल्यानंतर मी माझ्या पुढच्या कामाला निघत असताना लिफ्टमध्ये पुन्हा त्यांची आणि माझी भेट झाली. तेव्हा तेही मला म्हणाले तुला तर अभिनय केला पाहिजे.”
-
अनुपम खेर यांचीही मुलाखत घेण्याची प्रार्थनाला संधी मिळाली होती. तेव्हा त्यांनीही प्रार्थनाला अभिनय करण्याचा सल्ला दिला होता. (सर्व फोटो – फेसबुक)

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड