-
मराठीसह हिंदी चित्रपटात स्वत:च्या अभिनयाने एक वेगळं स्थान निर्माण करणारी हरहुन्नरी अभिनेत्री म्हणून वनिता खरातकडे पाहिले जाते.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे ती कायमच चर्चेत असते.
-
शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंग’ चित्रपटामध्ये तिने साकारलेल्या भूमिकेमुळे आजही ती अनेकांच्या लक्षात आहे.
-
रंग, रुप किंवा देहरचनेवर या सर्व मर्यादा तोडत तिने अभिनयाच्या जोरावर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
नुकतंच वनिताने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रेमाची कबुली दिली आहे.
-
वनिताने तिच्या बॉयफ्रेंडच्या वाढदिवसाचे औचित्य साधत इन्स्टाग्रामवर त्यांचा एक गोड फोटो शेअर केला आहे. या निमित्ताने वनिताने जाहिररित्या प्रेमाबद्दल सांगितले आहे.
-
“कुछ तूने सी है मैंने की हैं रफू….ये डोरियां …….हॅप्पी बर्थडे “साथी ” असे हटके कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.
-
त्याबरोबरच #milgayahumkosathimilgaya #partner #love #sumeetvani #specialperson #myman #firstphoto असे अनेक हॅशटॅगही तिने दिले आहे. यामुळे ती चर्चेत आली आहे.
-
सुमित लोंढे असे वनिताच्या बॉयफ्रेंडचे नाव आहे.
-
वनिताचा बॉयफ्रेंड सुमित हा एक व्हिडीओ क्रिएटर आणि ब्लॉगर आहे.
-
त्याला फिरण्याचीही प्रचंड हौस आहे.
-
तो सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो.
-
तो नेहमी विविध पोस्ट आणि फोटो शेअर करताना दिसतो.
-
त्याने त्याचे फिरण्याचे अनेक फोटो यापूर्वी शेअर केले आहेत.
-
सुमितने याआधी वनिताच्या वाढदिवसानिमित्तही एक खास पोस्ट शेअर केली होती.
-
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील अनेक मंडळी सुमितला ओळखतात. त्यांचे अनेक फोटोही त्याने शेअर केले आहेत.
-
त्यात त्याने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
-
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील अनेक मंडळी सुमितला ओळखतात. त्यांचे अनेक फोटोही त्याने शेअर केले आहेत.
बापरे! भरधाव ट्रकमधला पत्रा उडाला; तरुणाचं डोकं एकीकडे अन् शरीर एकीकडे, अपघाताचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO समोर