-
अभिनेत्री वैशाली ठक्करने काही दिवसांपूर्वी गळफास लावून आत्महत्या केली.
-
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेच्या माध्यमातून तिने कारकीर्दीची सुरुवात केली होती.
-
तिच्या मृत शरीराच्या शेजारी पोलिसांना सुसाईड नोट सापडली. या नोटमध्ये वैशालीच्या शेजारी राहणारा राहुल नवलानीच्या नावाचा उल्लेख आहे.
-
सुसाईड नोटमध्ये वैशालीने राहुल अडीच वर्षांपासून तिला त्रास देत असल्याचे स्पष्ट केले. तिने डायरीमध्येही बऱ्याचदा राहुलचे नाव आल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.
-
मागच्या १०-१२ वर्षांपासून राहुल आणि वैशाली एकाच सोसायटीमध्ये राहत आहेत.
-
राहुलच्या वडिलाचा इंदौरमध्ये प्लायवूड्सचा व्यवसाय आहे. करोना काळामध्ये वैशाली मुंबईहून इंदौरला परतली होती.
-
याच सुमारास ती राहुलच्या संपर्कात आली असल्याचा खुलासा वैशालीच्या भावाने केला.
-
पुढे तो म्हणाला, राहुल नवलानी माझ्या बहिणीला त्रास द्यायचा. तिला तुझं लग्न मी टिकू देणार नाही अशी धमकी द्यायचा. वैशालीने या संंबंधित सर्वकाही लिहिले आहे.
-
अडीच वर्षांपासून मी हा मानसिक त्रास भोगत आहे. राहुल आणि त्याच्या कुटुंबियांना शिक्षा झाल्याशिवाय माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही असे वैशालीच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलेले आहे.

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख